CM medical assistance cel : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामुळे सतराशे रुग्णांना दिलासा

बीड जिल्ह्यात उपचारासाठी तब्बल साडेतेरा कोटींची मदत
CM medical assistance cel
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामुळे सतराशे रुग्णांना दिलासाpudhari photo
Published on
Updated on

बीड ः शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‌‘आधार‌’ ठरत आहे. बीड जिल्ह्यात आर्थिक वर्षात 1773 रुग्णांना सुमारे 13 कोटी 69 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रुग्णालय, धर्मादाय रूग्णालय, संस्था, दाते आदींच्या सहकार्य लाभत आहे.

CM medical assistance cel
Thane medical aid fund: जिल्ह्यात 2 हजार 514 रुग्णांना 21 कोटींची मदत देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणा आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य मिळत आहे.

1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी 6 लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत बीड जिल्ह्यातील 1773 रुग्णांना सुमारे 13 कोटी 69 लाख 33 हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.

CM medical assistance cel
CM Devendra Fadnavis | चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करू नका: मुख्यमंत्री फडणवीस

रूग्ण व नातेवाईकांची होणारी धावपळ लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्ष, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, सामंजस्य करार आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यातून रुग्णांना वेळेत अर्थसहाय्य होत आहे. गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.

20 गंभीर आजारासाठी मदत

कॉक्लियर इम्प्लांट (वय वर्ष 2 ते 6), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फूस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी / रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news