Beed Illegal Sand Mining : वाळूमाफियांना चकलांबा पोलिसांचा दणका

गेवराई : साठ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना घेतले ताब्यात
Beed Illegal Sand Mining
Beed Illegal Sand Miningpudhari photo
Published on
Updated on

गेवराई ः बीड जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात चकलांबा पोलिसांनी मोठी कारवाई करत वाळूमाफियांना जबर धक्का दिला आहे. गायकवाड जळगाव व मालेगाव खुर्द शिवारात दोन ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायवा जप्त केले असून तब्बल 60 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी (दि. 10) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही धडक कारवाई केली. गोदावरी नदीपात्रातून कोणतीही शासकीय परवानगी नसताना वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन भारत बेन्झ कंपनीचे हायवा रंगेहाथ पकडले.

Beed Illegal Sand Mining
Jalna illegal sand transport : अवैध वाळूचा हायवा पकडला

तपासादरम्यान संबंधित वाहनांमधून अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी वाहने व वाळूसह एकूण 60.30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी प्रदीप बंकट कदम (वय 26, रा. सुरळेगाव) व रत्नेश्वर ऊर्फ बाळू शहादेव खेडकर (वय 33, रा. चकलांबा) यांच्यासह अन्य संबंधितांविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता नदीपात्रातील गौण खनिजाची वाहतूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

Beed Illegal Sand Mining
Sand Smuggling : वाळू तस्करांना दणका! जळगाव जिल्ह्यात पाच ठिकाणी पोलिसांचे छापे; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, प्रभारी पोलिस अधीक्षक चेतना तिडके, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख व उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन इंगळे तसेच पोलिस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news