

नेकनूर; पुढारी वृत्तसेवा : बीड तालुक्यातील करचुंडी येथे चार शेतकऱ्यांनी कापसाच्या शेतात गांजाची झाडे लावली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी ( दि.२५) चारही शेतकऱ्यांच्या शेतातील ६७१ गांज्याची झाडे हस्तगत करण्यात आली. हस्तगत केलेल्या गांजाची किंमत साडेसोळा लाख रूपये असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
करचुंडी येथील गावापासून काही अंतरावर डोंगराच्या आडोशाला कापसाच्या शेतात गांजाच्या झाडांची लागवड होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . त्यानुसार एपीआय विलास हजारे यांनी सोमवारी (दि.२५) या ठिकाणी छापा टाकला. यावेळी कापसाच्या पिकामध्ये १६ लाख ५४ हजार सहाशे रूपये किमतीची गांजाची झाडे आढळून आली. याप्रकरणी बाळासाहेब देवराव शिंदे (वय ३५), बंकट कल्याण शिंदे (वय ३५) दिगंबर अश्रुबा शिंदे ( वय ४५), कुंडलिक निवृत्ती आमटे यांच्याविरोधात नेकनूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई केजचे उपविभागीय आधिकारी आयपीएस पंकज कुमावत यांच्यासह एपीआय हजारे, पीएसआय पानपाटील, डोंगरे, बळवंत, विशाल क्षीरसागर, ढाकणे, पुंडे शेख, कुलकर्णी यांनी केली. यावेळी पंच म्हणून महादेव जायभाये मंडळाधिकारी,तलाठी शालिनी दोडके उपस्थित होते.
हेही वाचा :