Beed youth beaten death|'मोबाईल व ५० हजार चोरलेले परत दे', संशयावरून काठी-लाथाबुक्क्यांनी मारहाण, तरुणाचा मृत्यू

५ जणांविरुद्ध नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
 संभाजी सारूक
संभाजी सारूक
Published on: 
Updated on: 

नेकनूर (बीड) - मोबाईल व ५० हजार रुपये चोरी केल्याच्या संशयावरून एका तरुणास लाकडी काठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी वाणगाव जि. बीड येथे ही घटना घडली असून याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात दोन नामनिर्देशित व तीन अनोळखी अशा एकूण ५ आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 संभाजी सारूक
Beed Khurd Caves | बोरघाटातली बीड खुर्द लेणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संभाजी सारूक (रा. नांदगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) याला दि. १५ नोव्हेंबर, २०२६ रोजी सायंकाळी ४.०० ते रात्री ९.४५ वाजण्याच्या दरम्यान वाणगाव येथे आरोपी अशोक उर्फ पप्पू कागदे, पवन रोमन व इतर ३ अनोळखी लोकांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून "तू मोबाईल व ५० हजार रुपये चोरले आहेस, ते परत दे" असे म्हणत जाब विचारला.

या वादातून संभाजी यांच्या डोक्यावर लाकडी काठीने वार केले तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतर ३ अनोळखी आरोपींनी देखील मारहाणीत सहभाग घेतला. गंभीर जखमी झालेल्या संभाजी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 संभाजी सारूक
Beed News : शेख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड शहरात विराट मोर्चा

नेकनूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४०, १०३(१), ३(५)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती सपोनि. मंगेश साळवे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.