बीड : जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून वेटरचे अपहरण; तिघांवर गुन्हा

वेटरला एक किलोमीटर गाडीसोबत फरफटत नेले
waiter kidnapping News
जेवणाचे बिल मागितल्याच्या रागातून तिघांनी वेटरचे अपहरण केले.Pudhari File Photo
Published on
Updated on

दिंद्रुड : हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर जेवणाचे बिल मागितल्याप्रकरणी तिघांनी वेटरला एक किलोमीटरपर्यंत गाडीसोबत फरपटत नेले. त्यानंतर त्याला जबर मारहाण करून त्याला रात्रभर ओलीस ठेवले. ही घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीत घडली. शेख साहिल अनुसूद्दीन असे अपहरण करण्यात आलेल्या वेटरचे नाव असून याप्रकरणी सखाराम जनार्दन मुंडे (रा. भाईजळी ता.धारूर) याच्यासह अन्य दोघांविरूद्ध दिंद्रुड पोलिसात रविवारी (दि.८) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

waiter kidnapping News
पिंपळनेर : मनोरुग्ण मुलाने पित्याच्या डोक्यात दगड घालून केला खून;गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिंद्रुड पोलीस हद्दीतील मेहकर-पंढरपूर महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखाराम जनार्दन मुंडे व अन्य दोघेजण जेवणासाठी आले होते. त्यानंतर जेवण करून त्यांनी वेटरला बिल घेऊन ये, असं सांगितले. त्यानुसार शेख याने बिल दिल्यानंतर ते फोन पे च्या स्कॅनर वर टाकतो, म्हणून तिघेजण गाडीत जाऊन बसले.

वेटर स्कॅनर घेऊन गाडी जवळ गेला असता 'तू आम्हाला बिल का मागतोस' म्हणून वाद घालत चालकाशेजारी बसलेल्या एक जणाने त्याला धरून एक किलोमीटर पर्यंत फरफटत नेले. व त्यानंतर तिघांनी जबर मारहाण करून त्याच्या खिशातील ११५०० रुपये काढून घेतले. त्यांनतर गाडीच्या पाठीमागे टाकून डोळ्याला पट्टी बांधून अज्ञात स्थळी नेत अपहरण केले. शनिवारी रात्रभर हा वेटर गाडीतच होता. दरम्यान रविवारी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

waiter kidnapping News
बेळगाव : मुलीबाबत अफवा पसरवणार्‍या भावाचा खून

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news