Beed News | पोलिस कर्मचाऱ्यांशी घातली हुज्जत, कारवाई टाळण्यासाठी ट्रक चालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न ?

केज येथील प्रकार रस्त्यात ट्रक उभा केल्‍याबद्दल पोलिस करत होते कारवाई
प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on
गौतम बचुटे

केज : रस्त्यात वाहन उभे करून ते बाजूला घेण्या संदर्भात पोलिसांनी सांगूनही ते वाहन बाजूला न घेतल्यामुळे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारताच कारवाई टाळण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. ही कारवाई टाळण्यासाठी पोलिसांसोबत त्‍याने बराचवेळ हुज्‍जतपण घातली. याबाबत त्‍याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की,दिनांक ३० मे रोजी केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल नितीन जाधव हे शहरात पेट्रोलिंग करीत होते. त्‍यांना सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाई रोडवर संभाजीराजे चौक येथे ट्रक क्र. (एम एच- १४/डी एम- ७३७१) हा वाहतूकीस अडथळा होईल असा रस्‍त्यातच उभा केला असल्‍याचे दिसून आले.

प्रातिनिधीक छायाचित्र
Beed Crime News | केज पुन्हा हादरले! अनैतिक संबंधाच्या संशयावरून २ तरुणांना झाडाला बांधून काठी, बेल्टने मारहाण, एकाचा मृत्यू

याचा चालक अजय बबन इंगळे (रा. रजपुत झोपडपट्टी बेंबळी धाराशिव) याने हा ट्रक सार्वजनीक ठिकाणी बेकायदेशीररीत्या उभा केल्याचे निदर्शनास आले. त्या नुसार वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन जाधव यांच्या तक्रारी वरून ट्रक चालक अजय इंगळे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपणे तपास करीत आहेत.

प्रातिनिधीक छायाचित्र
Beed Police Action | केज येथील मुख्य रस्त्यावरील अडथळे दूर करण्यासाठी पोलिस ऍक्शन मोडवर!

कारवाई टाळण्यासाठी चालकाने घातला गोंधळ :

ट्रक चालक अजय बबन इंगळे याने ट्रक बाजूला घेण्यावरून पोलिसांशी हुज्जत घातली आणि कारवाई टाळण्यासाठी अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याची शहरात चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news