Beed News: अंबाजोगाई शहरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यावर ठिय्या

Beed News: अंबाजोगाई शहरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यावर ठिय्या

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : येल्डा रस्त्यावरील अजमेरनगर परिसरात तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या रस्त्यावर आढळून आल्याने शहरात खळबळ माजली आहे. ईश्वर अरुण जोगदंड (वय ३१, रा. परळीवेस, साठेनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. नातेवाईकांनी ईश्वरच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला. Beed News

अजमेरनगर परिसरात सकाळी ग्रामीण भागातून येणाऱ्या दूध विक्रेत्यांना मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. शासकीय रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र, नातेवाईक ईश्वरच्या मृत्यूस कारणीभूत आरोपीवर गुन्हा दाखल कऱण्याच्या मागणीवर ठाम होते. Beed News

नातेवाईकांनी व इतर नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला होता. पोलिसांनी संतप्त जमाव आक्रमक होत असल्याने शांत करण्यासाठी तात्काळ नातेवाईकांचा जवाब नोंदवून घेण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत जवाब नोंदविण्याचे सुरू काम सुरू होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news