बीड : अवैध वाळू उपसा करताना मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू

बीड : अवैध वाळू उपसा करताना मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू

गेवराई, पुढारी वृत्तसेवा ः तालुक्यातील सावळेश्वर परिसरातील गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा करताना एका मजुराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेने गेवराई तालुक्यात महसूल व पोलिस प्रशासन करत असलेली कारवाई ही केवळ फ ोटोपुरतीच असल्याचे समोर आले असून प्रत्यक्षात गोदापात्र वाळूमाफि यांना मोकळेच असल्याचे चित्र आहे.

नसिब हबीब शेख (25, रा.हादगाव, जि.जालना) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. गेवराई तालुक्यातील सावळेश्वर-म्हाळस पिंपळगाव शिवारातील गोदापात्रात बुधवारी रात्री अवैध वाळू उपसा केला जात होता. यावेळी केनीची दोरी तुटल्याने शेख हे पाण्यात पडले, बराच वेळ ते बाहेर न आल्याने त्यांचा शोध घेतला, परंतु ते मिळून आले नाहीत.यानंतर गुवारी सकाळपासूनच त्यांचा शोध सुरू होता. अशेख सायंकाळच्या सुमारास शेख यांचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी दाखल होत शोधकार्यात मदत केली. तसेच एनडीआरएफ चे पथक व महसूल अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते.

प्रशासनाची कारवाई जुजबी

अनेकदा महसूल व पोलिस प्रशासनाकडून टिप्पर, वाळू पकडल्याचे सांगितले जाते. परंतु दिवसभरात शेकडो टिप्पर या ठिकाणाहून भरून नेले जात असतांना कारवाईचे प्रमाणपत्र अगदी बोटावर मोजण्याएवढे आहे. दररोज हा प्रकार होत असतांना महसूल व पोलिस प्रशासन मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता केला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news