Beed Breaking | निलंबित पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी गळफास घेऊन संपवले जीवन

अंबाजोगाईतील घटना; कुटुंबीय गावी गेल्‍याने घरी होते एकटेच, कारर्कीद होती वादग्रस्‍त
Beed Breaking
निलंबित पोलिस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी गळफास घेऊन संपवले जीवन
Published on
Updated on

बीड : एप्रिल महिन्यात निलंबित झालेले माजी पोलिस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी अंबाजोगाई येथील भाड्याने रहात असलेल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ८ वाजता उघडकीस आली आहे. या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Beed Breaking
Beed Crime|अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात घुसणाऱ्या भरधाव कारने हवालदारालाच 80 मिटर नेले फरफटत!

परळी तालुक्यातील नागदरा हे सुनील नागरगोजे यांचे मूळ गाव आहे. मात्र अनेक वर्षांपासून कुटुंबियांसह अंबाजोगाईत वास्तव्यास होते. परभणी, लातूर, बीड येथे त्यांनी काम केले होते. लातूर येथे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार सांभाळला होता. परभणी येथे त्यांनी एका पोलिस अधीक्षकांना शिविगाळ केली होती. त्या प्रकरणात चौकशी सुरू होती. बीडला बदली झाल्यानंतरही त्यांनी एका कर्मचा-याला शिविगाळ करून धमकी दिली होती. बीडला त्यांना नियंत्रण कक्षातच ठेवेले गेले होते. परभणीच्या प्रकरणात एप्रिल २०२५ मध्ये त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. तेंव्हापासून ते नैराश्यात होते. मुले पुण्याला शिक्षण घेत असल्याने त्यांच्या पत्नी मुलांकडे पुण्याला गेल्याचे बोलले जात आहे. अंबाजोगाई येथे घराचे बांधकाम सुरू असल्याने अंबाजोगाई येथील भाड्याचा घरी सुनिल नागरगोजे हे एकटेच होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Beed Breaking
Beed Crime|रिकाम्या प्लॉटमध्ये केली गांजाची लागवड : पोलिसांनी केलेल्या कारवाईत दहा हजाराचा गांजा जप्त

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. दरम्यान सुनील नागरगोजे यांनी आत्महत्या कधी व का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन सुनील नागरगोजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी तथा शवविच्छेदनासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news