

केज :- नातेवाईकांच्या रिकाम्या प्लॉटमध्ये एकाने चक्क गांजाची झाडे लावली होती. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून दहा हजाराचा गांजा जप्त केला आहे.
दि. ३१ ऑगस्ट रोजी गौरी गणपतीच्या पूर्वसंध्येला केज पोलिसांना माहिती मिळाली की, केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोठी या गावात अंकुश मल्हारी गायकवाड यांने त्याच्या घरा समोर असलेल्या त्याचे नातेवाईक बारीकराव कडूबा शिनगारे यांच्या रिकाम्या प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये गांजाच्या झाडाची लागवड केली आहे. याची माहिती मिळताच दि. ३१ ऑगस्ट रोजी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलिस उपनिरीक्षक इनामदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनवने, पोलिस हवालदार शेप, पोलिस हवालदार चंद्रकांत काळकुटे यांनी छापा टाकला.
त्यावेळी अंकुश गायकवाड याने त्याच्या घराशेजारी असलेल्या त्याचे नातेवाई बारीकराव शिनगारे याच्या रिकाम्या प्लॉट मध्ये गवतात ९ गांजाची झाडे लावली असल्याचे आढळून आली. पोलिसांनी ती झाडे जप्त करून त्याचे वजन केले असता त्या गांजाच्या ९ झाडांचे वजन ३.४५२ किलो ग्रॅम असून त्याची किंमत १ हजार ३५६ रु. इतकी आहे. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संदीप मांजरमे यांच्या तक्रारी वरून दि. १ सप्टेंबर रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास अंकुश गायकवाड याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे हे तपास करीत आहेत.
आरोपी पळाला :- पोलिस आल्याची चाहूल लागताच गांजाची लागवड करणारा आरोपी अंकुश गायकवाड पळून गेला. त्याचा पोलिस तपास करीत आहेत.