बीड : सिरसदेवीजवळ एसटी - दुचाकीची धडक; दोन विद्यार्थी जखमी

क्लासवरून येताना अपघात, एकाची प्रकृती गंभीर
Beed accident News
एसटीला दुचाकी समोरून धडकल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाली. File Photo
Published on
Updated on

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : क्लासवरून दुचाकीवरुन गावाकडे परत जात असताना एसटीला दुचाकी समोरून धडकल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाली. ही घटना आज (दि.२०) सकाळी पाथर्डी-विशाखापट्टमण राष्ट्रीय महामार्गावरील सिरसदेवी जवळील रुई फाटा येथे घडली. करण गणेश उनवणे (वय १८) व कृष्णा अनिल लोखंडे (वय १९, रा. रुई, ता. गेवराई) असे गंभीर जखमी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

Beed accident News
बीड : पिकअपचे टायर फुटून अपघात; २५ वारकरी जखमी

गणेश उनवणे, कृष्णा लोखंडे गंभीर जखमी

याबाबत अधिक माहिती अशी की, नीट परीक्षेसाठी या विद्यार्थिंनी सिरसदेवी येथे खासगी कोचिंग क्लास लावला आहे. नेहमीप्रमाणे गणेश आणि कृष्णा कोचिंग क्लास संपल्याने सिरसदेवी येथून पाथर्डी- विशाखापट्टमण राष्ट्रीय महामार्गावरून दुचाकीवरुन रुईला जात होते. यावेळी समोरील येत असलेल्या माजलगाव-पुणे बसला दुचाकी धडकल्याने दुचाकीवरील गणेश उनवणे, कृष्णा लोखंडे गंभीर जखमी झाले.

Beed accident News
बीड : वारकरी महिलेचा पंढरपुरात हृदयविकाराने मृत्यू

जखमी विद्यार्थ्यांना बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news