बीड : पिकअपचे टायर फुटून अपघात; २५ वारकरी जखमी

सोलापूर-धुळे महामार्गावरील घटना
Beed accident News
बीडजवळ अपघातात २५ वारकरी जखमी झाले.File Photo

बीड : पंढरपूरवरून कन्नड तालुक्यातील दहिगाव येथे जात असलेल्या वारकऱ्यांच्या पिकअप वाहनाचे टायर बीडनजिक फुटले. या अपघातात पंचवीस वारकरी जखमी झाले असून यातील तीन महिला गंभीर आहेत. ही घटना बुधवारी (दि.१७) रात्री नऊच्या सुमारास घडली.

Beed accident News
Patna Road Accident : पाटण्यामध्ये भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, ५ जखमी

पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेले कन्नड तालुक्यातील दहिगाव येथील वारकरी परत गावी जात होते. त्यांना घेऊन जाणारे पिकअप गाडीचे सोलापूर -धुळे महामार्गावरून जात असताना रामनगरनजीक एक टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून पिकप डिव्हायडरला धडकले. यावेळी दुसरेही टायर फुटल्याने गाडी पलटी झाली. यात २५ वारकरी जखमी झाले असून तीन महिला गंभीर जखमी आहेत. जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news