Beed electric shock death: श्रावणातील जलाभिषेक ठरला अखेरचा; देवदर्शनासाठी गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

या दुर्घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे
Beed electric shock death: श्रावणातील जलाभिषेक ठरला अखेरचा; देवदर्शनासाठी गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
Published on
Updated on

केज : श्रावण महिन्यात गोदावरीचे पवित्र पाणी आणून देवाला जलाभिषेक करण्यासाठी मंदिरात गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा उघड्या वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे शुक्रवारी (दि. २८ ऑगस्ट २०२६) पहाटे चारच्या सुमारास घडली. या दुर्घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Beed electric shock death: श्रावणातील जलाभिषेक ठरला अखेरचा; देवदर्शनासाठी गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
Beed Rain | पावसाने दगा दिला: दुष्काळाची चाहूल; पिके करपू लागली, विहिरींची पाणीपातळी खालावली

जिवाचीवाडी येथील युवराज आसाराम चौरे (वय २२) हे श्रावण महिन्यातील पारंपरिक जलाभिषेकासाठी गोदावरी नदीचे पाणी आणण्याची सेवा पार पाडत होते. गावातील नारद स्वामी मंदिरात दररोज एका व्यक्तीने गोदावरीचे पाणी आणून देवाला अर्पण करण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार युवराज गुरुवारी रात्री दुचाकीवरून माजलगाव तालुक्यातील मोगरा शिवारात गेले. तेथून गोदावरीचे पाणी घेऊन ते गावात परतले. शुक्रवारी पहाटे सुमारे चार वाजता ओल्या वस्त्रांमध्ये अत्यंत भक्तिभावाने ते नारद स्वामी मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी गेले होते. मात्र, मंदिराच्या गाभाऱ्याजवळ जमिनीवर पडलेल्या उघड्या वीजवाहक तारेला त्यांचा पाय लागला. विजेचा तीव्र धक्का बसताच ते जागीच कोसळले.

Beed electric shock death: श्रावणातील जलाभिषेक ठरला अखेरचा; देवदर्शनासाठी गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
Beed  Theatre Renovation Still Delayed| नाट्यगृहाच्या दुरुस्तीची तिसरी घंटा कधी वाजणार?

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

घटनेनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी युवराज यांना तातडीने धारूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. धारूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता जिवाचीवाडी येथील काळअंबा वस्तीवरील शेतात शोकाकुल वातावरणात युवराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Beed electric shock death: श्रावणातील जलाभिषेक ठरला अखेरचा; देवदर्शनासाठी गेलेल्या २२ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू
Beed Accident : सरकीचा ट्रक पलटी होऊन चालक ३० फूट दरीत कोसळला

गावात हळहळ

युवराज चौरे यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. ऐन तारुण्यात झालेल्या त्यांच्या दुर्दैवी निधनामुळे जिवाचीवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news