

Beed Scorpio car hit a person
बीड, पुढारी वृत्तसेवा : रविवारी पहाटेच्या सुमारास बीड शहरातील डीपी रोडवर थरार घडला. जालना रोड भागात झालेल्या किरकोळ वादातून कारचालकाने दुचाकी चालकांचा पाठलाग करत त्यांना धडक दिली यानंतर ही दुचाकी विजेच्या खांबावर आधारल्याने दो घेही जखमी झाले. या प्रकरणात बीडमधील शहर पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोघे युवक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
मोहम्मद समी मोहम्मद कलीम शेख (१९, रा. बलभिम चौक, बीड) आणि सय्यद दानिश सय्यद ऐतेशाम उल हक (१९, रा. पात्रुड, ता. माजलगाव) हे दोघे तरुण रविवारी पहाटे २ च्या सुमारास स्कुटीवरून घरी परतत होते.
दरम्यान, स्कॉर्पिओ गाडीमधून आलेल्या परशुराम गायकवाड टोळीतील सहा जणांनी त्यांचा पाठलाग केला. कट का मारला? अशी दमदाटी करत त्यांनी रस्त्यावर शिवीगाळ केली हा वादाचा प्रकार जालना रोड भागात घडला त्यानंतर हे दोघे तरुण पुढे निघाले असताना स्कॉर्पिओ गाडीने त्यांचा पाठलाग सुरू केला यामुळे हे तरुण मोंढा रोड वरून डीपी रोडकडे वळले रोडवरील दोघेही युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी शेख अयाज शेख सलाउद्दीन यांच्या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात परशुराम गायकवाड, मोहन उर्फ राजू गायकवाड व चार अनोळखी इसमांवर कलम १०९(१), ३५१(३), ३५२, १२५ (ब), ३(५) अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.