

Santosh Deshmukh murder case:
बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सगळे व्हिडिओ हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. “सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे” अस देशमुख यांच्या तोंडातून वदवून घेत असल्याचा व्हिडिओ पोलीसांना हाती लागला आहे. त्याचबरोबर देशमुख यांच्या तोंडावर लघवी करतानाचा व्हिडिओही पोलिसांनी हस्तगत केला आहे. फोनमधील हे व्हिडीओ डिजिटल पुरावे म्हणून न्यायालयात सादर केले जाणार असल्याने वाल्मीक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Beed Crime News)
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या बहुचर्चित हत्याकांडातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचाच सदस्य असल्यावर विशेष मोक्का न्यायालयाने याआधी शिक्कामोर्तब केले आहे. आता कराडचा खंडणी मागण्यात सहभाग असल्याचे धागे दोरे मिळवण्यात पोलिस यंत्रणेला यश आल्याची आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. पुढील सुनावणीवेळी मिळालेले सगळे व्हिडिओ पोलीस न्यायालयात मांडण्याची शक्यता आहे. (Beed Crime News)