Beed police transfers : बीडचे पोलिस अधीक्षक यांना मॅटचा दणका

अठरा पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या रद्द
Beed police transfers controversy
बीडचे पोलिस अधीक्षक यांना मॅटचा दणकाpudhari photo
Published on
Updated on

बीड : मागील वर्षी बीडच्या पोलिस अधीक्षकांनी मोठ्या स्वरूपात केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या वादग्रस्त ठरल्या होत्या. अनेक कर्मचाऱ्यांनी या बदल्यांना महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) आव्हान दिले होते. त्यातील १८ बदल्या मॅटने रद्द केल्या आहेत. पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेला ही सण-सणीत चपराक मानली जात आहे.

बीडच्या पोलिस अधीक्षकांनी मागच्या वर्षी शेकडो कर्मचाऱ्यांच्या घाऊक बदल्या केल्या होत्या. एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्यांची ही पहिलीच वेळ होती. स्वग्राम, खंडीत, अखंडित आदींच्या नावाखाली कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या बदल्यांमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. अनेकांनी या बदल्यांना मॅट मध्ये आव्हान दिले होते. त्याची सुनावणी देखील दीर्घकाळ चालली. यात आता अखेर मॅट ने निर्णय दिला असून तब्बल १८ बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Beed police transfers controversy
Police Transfer 2026: राज्यात 9 पोलिस अधीक्षक, उपायुक्तांच्या बदल्या

मॅट ने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी एकाच जागी ५ वर्ष हा निकष आहे, मात्र स्वग्राम आणि खंडित अखंडित सेवा असे निकष लावता येणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आता या निर्णयाचा इतरही अनेक बदल्यांवर परिणाम होऊ शकतो. या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने विधिज्ञ ओ डी माने, अमोल चालक आदींनी बाजू मांडली.

Beed police transfers controversy
Police Transfer 2026: नवी मुंबईतील 700 पोलिसांच्या मेअखेर किंवा जूनमध्ये बदल्या

यांच्या बदल्या झाल्या रद्द..!

बाळकृष्ण जायभाये, संगीता शिरसाट, कृष्णा जायभाय, संतोष गाडे, रामहरी भंडाने, माधव भागवत, रेखा पवार, सौदागर सावंत, सुभाष क्षीरसागर, सुसेन पवार, परमेश्वर शिंदे, प्रकाश गायकवाड, दत्तात्रय उबाळे, उस्मान शेख, संजयकुमार राठोड, सचिन जायभाये, तानाजी डोईफोडे, मनोज घोडके.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news