

beed No-confidence motion passed against sarpanches in Lonval-Babi
वडवणी, पुढारी वृत्तसेवा वडवणी तालुक्यातील लोणवळ बाबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मुक्ताबाई अंकुश राठोड यांच्याविरोधात आयोजित विशेष ग्रामसभेत अविश्वास ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. ६७४ मतदारांनी ठरावाच्या बाजूने तर २९८ मतदारांनी विर ोधात मतदान केल्याने जनतेतून थेट निवडून आलेल्या सरपंचांना जनतेनेच पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला.
वडवणी तालुक्यातील काडीवडगावनंतरची ही दुसरी घटना असल्याने संपूर्ण परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. गावातील विविध विकासकामांमध्ये अनियमितता, कथित भ्रष्टाचार, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, तसेच ग्रामस्थांची कामे वेळेत न करणे व त्यांची अडवणूक करणे अशा गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर हा अविश्वास ठराव आणण्यात आला होता.
ग्रामपंचायत सदस्यांनी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ८ विरुद्ध २ अशा बहुमताने ठराव मंजूर करून तो पंचायत समितीकडे सादर केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. २७फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
या ग्रामसभेसाठी एकूण निर्णयाविर की, ९७२ मतदारांनी हजेरी लावली. मतदान प्रक्रियेत ६७४ मतदारांनी सरपंचांच्या विर ोधात स्पष्ट कौल दिला, तर २९८ मतदारांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. बहुमताने ठराव मंजूर झाल्याने सरपंच मुक्ताबाई अंकुश राठोड यांना पद गमवावे लागले आहे. ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी अशोक निर्डे, शेख रफीक, दीपक जोगदंड, ग्रामपंचायत अधिकारी व्ही. बी. पवार, सचिव गोवर्धन गिरी तसेच वडवणी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कालावधीत ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या अनेक विकासकामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव होता. सदस्यांना कोणतीही माहिती न देता निर्णय घेण्यात येत होते. तसेच ग्रामस्थांची कामे प्रलंबित ठेवून त्यांची अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
या सर्व कारणांमुळे सरपंचांविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोणवळ बाबी येथील या घडामोडीमुळे तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय वातावरण तापले असून पुढील सरपंच निवडीची प्रक्रिया कशी पार पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जनतेने दिलेला हा कौल स्थानिक प्रशासनासाठीही महत्वाचा