Beed News | झटका मशीनचा शॉक लागून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!

मानमोडी येथील घटना, वन्यप्राण्यांपासून सुटका होण्यासाठी घातलेहोते झटका मशीन तारेच कुंपण
Beed News
Beed News | झटका मशीनचा शॉक लागून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!
Published on
Updated on

गेवराई : गेवराई तालुक्यातील मानमोडी येथे झटका मशीनचा शॉक लागून एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. सुधाकर रावसाहेब जाधव असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

मानमोडी येथील रहिवासी असलेले सुधाकर जाधव यांच्या मालकीची शेतजमीन गावालगत आहे. सध्या त्यांच्या शेतात ज्वारी, गहू, हरभरा व भुईमूग ही पिके घेतलेली होती. वन्यप्राण्यांपासून — विशेषतः रानडुक्कर व हरीण — पिकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी शेतात झटका मशीन बसवले होते.

रविवारी सकाळी शेतात गेले असता तोल जाऊन झटका मशीनला त्यांचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जबरदस्त विद्युत धक्का बसला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. दरम्यान, दुपारी सुमारे चार वाजता गावातील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातू व भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे मानमोडी परिसरात शोककळा पसरली असून शेतकऱ्यांनी अशा विद्युत यंत्रणांचा वापर करताना योग्य सुरक्षिततेची खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news