Beed News : यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो : जिल्हाधिकारी जॉन्सन

'कलेक्टरांशी गप्पा' अभिनव उपक्रम; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी रंगला मुक्त संवाद
Beed News
Beed News : यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो : जिल्हाधिकारी जॉन्सनfile photo
Published on: 
Updated on: 

Beed News: There is no shortcut to success: District Collector Johnson

बीड, पुढारी वृत्तसेवा : स्पर्धा परीक्षा असो वा आयुष्यातील कोणतेही ध्येय, कष्टाला आणि सातत्याला पर्याय नाही. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, तर नियोजनबद्ध दैनंदिनी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरच यशशिखर गाठता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.

Beed News
Beed News : पाडळसिंगी टोल नाक्यावर पोलिसांना भरधाव कारने उडवले; दोघे जखमी

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शनिवार रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कलेक्टरांशी गप्पा या अभिनव उपक्रमात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी शिला मिसाळ, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी श्री. इगारे, शिक्षण विभागाचे अधिकारी प्रमुख उपस्थित होते.

कलेक्टरांशी गप्पा

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्वतःची दैनंदिनी कशी असावी यावर प्रकाश टाकला. यामध्ये दिवसाची सुरुवात लवकर करून अभ्यासाचे तास निश्चित करावेत. दररोज वर्तमानपत्रे आणि दर्जेदार पुस्तकांचे वाचन अवांतर ज्ञानासाठी आवश्यक आहे.

अपयशाने खचून न जाता, चुकांमधून शिकून पुढे जावे. अभ्यासासोबतच पुरेशी झोप, व्यायाम आणि ध्यानधारणा अत्यंत गरजेची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे जिल्हाधिकारी श्री. जॉन्सन यांनी अत्यंत सोप्या भाषेत निरसन केले. त्यांच्या या मार्गदर्शनाने उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये एक नवा उत्साह आणि ऊर्जा पाहायला मिळाली.

Beed News
Beed Crime : लॉजमध्ये रंगला तीन पत्तीचा डाव

कलेक्टरांशी गप्पा या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थी-कलेक्टर संवाद सत्र 3 अत्यंत उत्साही आणि हसतखेळत वातावरणात संपन्न झाले. विशेष म्हणजे, शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपली कर्तव्यदक्षता दाखवत विद्यार्थ्यांसाठी तब्बल दोन तास वेळ दिला आणि त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.

या संवाद सत्राचा समारोप करताना जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी विद्यार्थ्यांना आयुष्याचा एक मोठा मंत्र दिला. तुम्ही भविष्यात कलेक्टर, इंजिनिअर, डॉक्टर काहीही व्हा, पण मोठे झाल्यावर आपल्या गावाला आणि जिल्ह्याला कधीही विसरू नका. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या गावासाठी नक्की काहीतरी करा.

तसेच विद्यार्थ्यांनी नेहमी जात-धर्म बाजूला ठेवून अगोदर माणुसकी जपली पाहिजे, कारण जगात माणुसकीच सर्वात महत्त्वाची आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक आश्रोबा मुंडे, शिक्षक किशोर ढवळशंख, सुभाष चिकाळकर, श्रीमती वत्सला गुरसाळी यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चित्रपट पाहून मिळाली प्रेरणा !

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपल्या बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, माझे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयात पुर्ण झाले आहे. केरळमध्ये फुटबॉल मोठ्या प्रमाणात खेळला जातो, तिथे मल्याळम चित्रपटसृष्टीत जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांच्यावर आधारित अनेक चित्रपट असतात. ते चित्रपट पाहूनच मला जिल्हाधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली. अगदी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीतही मला प्रेरणा कशी मिळाली हाच प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, तुम्हाला प्रेरणा कुठून मिळते यापेक्षा तुम्ही त्यानंतर घेतलेले परिश्रम आणि प्रयत्न किती प्रामाणिक आहेत, हे जास्त महत्त्वाचे आहे. युपीएससी परीक्षा देऊन कशाप्रकारे कलेक्टर आणि एसपी होता येते, तसेच जिल्हाधिकाऱ्यांची कामे आणि त्यांची एकूण कार्यपद्धती कशी असते, हे त्यांनी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.