Beed Drowning Incident : तलावात बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या पित्याचा मृत्यू

बीड शहराजवळील उखंडा तलावात घडलेली घटना
Drowning
Drowning Pudhari
Published on
Updated on

बीड : शहराजवळ असलेल्या उखंडा तलावामध्ये बुडणाऱ्या मुलांना वाचवताना पित्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह तलावाबाहेर काढला. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Drowning
Beed News : विलास घुले कुटुंबीयांच्या उपोषणाचा तिसरा दिवस

राजेंद्र वामन निर्मळ ( ४५, मुळगाव लिंबागणेश, हल्ली मुक्काम अंकुश नगर बीड) हे त्यांची पत्नी वैशाली निर्मळ, मेहुणी निशा, व मुले पियुष, आयुष आणि शुभम यांच्यासह बीड शहराजवळ असलेल्या खंडा तलावाच्या परिसरात पर्यटनासाठी गेले होते. यावेळी पियुष, आयुष व शुभम ही मुले तलावात पोहण्यासाठी उतरली होती. परंतु काही वेळातच त्यांचा आरडाओरडा ऐकू आल्याने राजेंद्र निर्मळ यांनी तिकडे धाव घेतली. परंतु ते मुलांकडे जात असताना मध्येच असलेल्या एका कोण खड्ड्यामध्ये बुडाले.

Drowning
Beed News: गावातील महिलांचे गुपचूप फोटो काढायचा, AIच्या मदतीने स्वतःसोबत जोडायचा आणि...; नराधमावर गुन्हा दाखल

परिसरातील इतर लोकांनी या मुलांना वाचवले. परंतु तोपर्यंत राजेंद्र निर्मळ यांना वाचवता आले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत निर्मळ यांचा मृतदेह तलावाच्या बाहेर काढला. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news