Beed News : विलास घुले कुटुंबीयांच्या उपोषणाचा तिसरा दिवस

तिघांचीही प्रकृती खालावली; दोन नातेवाईकांचे इमारतीवर चढून आंदोलन
Beed News
Beed News : विलास घुले कुटुंबीयांच्या उपोषणाचा तिसरा दिवसfile photo
Published on
Updated on

Third day of the hunger strike by Vilas Ghule's family

बीड, पुढारी वृत्तसेवा : स्व. विलास घुले यांच्या खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावे या मागणीसाठी घुले कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी या उपोषणाचा तिसरा दिवस होता. रमेश घुले, सुषमा घुले व आशाबाई घुले यांची तपासणी डॉक्टरांनी केली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे घुले कुटुंबीयांच्या दोन नातेवाईकांनी जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाच्या छतावर चढत आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Beed News
Oil Black Market : बीडमध्ये तेलाचा काळाबाजार; चार आस्थापनांवर धाड

केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची 21 जून रोजी चाकूचे वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दहा आरोपींना अटक करण्यात आली असून काही दिवसांपूर्वीच तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. परंतु रमेश घुले यांच्या पुरवणी जवाबामध्ये खा. बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे याच्यासह अन्य दोघांचा या कटामध्ये सहभाग असल्याचा उल्लेख आहे.

त्यानुसार या सर्वांना अटक करावी या मागणीसाठी आमच्या लेकर गेल्या तीन दिवसांपासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले आहे. शुक्रवारी पोलिस महासंचालक सदानंद दाते हे बीडमध्ये असल्याने त्यांनी उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली होती.

Beed News
UPSC Success Story Beed : गाढे पिंपळगावच्या शेतकरीपुत्राची ‘गरुडझेप’; चैतन्य राडकर याचे पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत यश

दरम्यान, शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घुले कुटुंबीयांची तपासणी केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे पत्र शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे.

तर दुसरीकडे उपोषणाची दखल प्रशासन घेत नसल्याने संताप व्यक्त करत घुले यांच्या दोन नातेवाईकांनी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयावर चढत आंदोलन सुरू केले आहे. दोन ठिकाणी आंदोलन सुरू असल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी त्याच ठिकाणी तळ ठोकून आहेत. दरम्यान, सायंकाळच्या वेळी एक शिष्टमंडळ सदानंद दाते यांची भेट घेण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news