बीड : नेकनूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून सहाजणांना केले जेरबंद

वर्दळीच्या ठिकाणी पोलिस-आरोपींचा थरार; बघ्यांची गर्दी
beed News
नेकनूरमध्ये पोलिस-आरोपींचा थरारFile Photo
Published on
Updated on

नेकनूर : बीडमध्ये एकावर जीवघेणा हल्ला करून जीपमधून पळालेल्या आरोपींचा मंगळवारी (दि.६) सायकांळी ५.३० वाजता पोलिसांनी थरारक पद्धतीने पाठलाग केला. संशयित आरोपींनी वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांना चकवा दिला. मात्र मोठ्या शिताफीने पोलिसांनी या आरोपींचा जीपचा पाठलाग करून त्यांना नेकनुरच्या बाजारतळाजवळील शेतात गाठले. व शेतातून पळत असताना पाठलाग करून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

beed News
Jitendra Awhad Car Attack | आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला

याबाबत अधिक माहिती अशी, बीडमध्ये एकावर जीवघेणा हल्ला करून काहीजण बीड नेकनूरकडे जात असल्याची माहिती वरिष्ठाकडून नेकनूर पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार सपोनि चंद्रकांत गोसावी यांनी विलंब न करता एका वाहनातून पीएसआय नितीन गट्टूवार यांना बीड रोडनजीक पाठवले. मात्र या गाडीला हुलकावणी देऊन एक जीप भरधाव वेगाने नेकनूरकडे आली. त्यानंतर तेवढ्याच भरधाव वेगाने सपोनि गोसावी यांनी पोलिस जीप गाडी घेऊन रस्त्यावरून धावले. सगळ्यांच्या नजरा पोलीस गाडीकडे होत्या.

beed News
महिलेवर चाकू हल्ला करणार्‍या सुरक्षारक्षकाला बिहारहून अटक

रस्त्यावर दुसरी पोलीस गाडी दिसताच रस्ता सोडून आरोपींनी नेकनुरच्या बाजारतळाकडे भरधाव वेगाने जीप पळवली. रस्ता संपल्याचे लक्षात येताच गाडी सोडून आरोपी बाजूला असलेल्या शेतातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सपोनी चंद्रकांत गोसावी, पीएसआय नितीन गट्टूवार, पोलीस कॉन्स्टेबल भोसले, गोविंद राख,सय्यद गुलाब , मुकुंद ढाकणे ,शेख इसाक, मुंतु आतार यांनी धावत जाऊन पाठलाग करत मोठ्या शिताफीने आरोपींना पकडले. त्यांच्या वाहनात पोलिसांना हत्यारे सापडले असून अगदी वर्दळीच्या ठिकाणीच हा थरार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. सगळे भारदस्त असल्याने मोठी गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी पकडली, असा कयास नेकनूरकर बांधत होते. मात्र त्यांनी जुन्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला करून बीडमधून पळ काढल्याचे समोर आले. या घटनेमुळे बीडमध्ये काहीकाळ गर्दी आणि तणावाची परिस्थिती होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news