बीड: धारूर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी-भाजपचे वर्चस्व

बीड: धारूर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी-भाजपचे वर्चस्व

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. यात थेटेगव्हान, काठेवाडी, व्हरकटवाडी या तीन ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडणूक झाली. तर मोहखेड येथील सरपंच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरीत १७ ग्रामपंचायतसाठी रविवारी (दि.५) मतदान झाले. तर आज (दि. ६) तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.

या निवडणुकीत मतदारांनी तरुणांना संधी दिलेली पाहायला मिळाली. यामध्ये सरपंचपदासाठी महिलांनी वर्चस्व गाजविले. तर या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी -भाजपचे वर्चस्व राहिले. सरपंच पदावर महिला उमेदवार निवडून आल्या आहेत. विजयी उमेदवारांनी व समर्थकांनी तहसील परिसरात तसेच शहरातून रॅली काढून गुलाल, फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

आज सकाळी १० पासून तहसील कार्यालयाच्या तळमजल्यामध्ये मतमोजणी करण्यात आली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी ठिकाणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक विजय आटोळे यानी भेट देऊन पाहणी केली.

धारूर तालुक्यातून निवडून आलेले सरपंचपदाचे उमेदवार


गाव                      सरपंच

१) गोपाळपूर – सोनाली संतोष सोनवणे.
२)मोरफळी – मंडोदरी श्रीराम गडदे.
३) सिंगणवाडी – मीरा दयानंद भोसले
४) चारदरी – गंगाबाई आंबुरे
५) पहाडी पारगांव- सोनाली बालासाहेब अंडील
६) पिंपरवाडा – विश्वनाथ तिडके –
७) कान्नापूर – गोपाळ कुकडे.
८) भोगलवाडी – चंद्रकला सचिन सुदे
९) चिकली – जयश्री विलास शेंडगे
१०) हिंगणी – योगेश सूर्यकांत सोळंके.
११) मोहखेड – ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे
१२) सोनीमोहा- मनिषा राहुल तोंडे –
१३) सुकळी – बालासाहेब आश्रुबा सोंदनकर – १४)धुनकवड- भागवत गव्हाणे
१५) सुरनरवाडी – रुक्मिणी सिताराम लिंगे.
१६) कुंडी – सत्यभामा आसाराम कांदे
१७) हिंगणी खुर्द – प्रियंका नंदकुमार सोळुंके

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news