Beed News : डॉ.सारिका क्षीरसागरांनी मांडला शहर विकासाचा रोडमॅप

बीड नगर परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत सादर केले अनेक प्रस्ताव
Beed municipal administration
डॉ.सारिका योगेश क्षीरसागरpudhari photo
Published on
Updated on

बीड : बीड नगरपरिषदेच्या स्थायी समितीची पहिली बैठक बुधवारी (दि.11) पार पडली असून या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासंबंधी विविध महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आले. भाजपच्या गटनेत्या व स्थायी समिती सदस्या डॉ.सारिका योगेश क्षीरसागर यांनी बीड शहरवासीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसह भविष्यातील विकास आराखड्यासंदर्भात अनेक प्रस्ताव सभागृहासमोर मांडले.

नगराध्यक्ष प्रेमलता पारवे, समिती सभापती, सदस्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी जिल्हा वार्षिक योजना 2026-2027 अंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये रस्ते व नाली बांधकामासाठी कामांची नावे सुचवली तसेच नगरपरिषद इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प बसवणे आणि हद्दवाढ भागात 500 नवीन विद्युत खांब उभारण्यासाठी विद्युत मंडळाकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी केली.

Beed municipal administration
Lal Bavta protest at Majalgaon : जुना रोजगार हमी कायदा मजबूत करा

पाणीपुरवठा सुधारण्यासाठी धानोरा रोड मार्गे अमृतअटल योजना 2.0 अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यासोबतच इदगाह पाण्याच्या टाकीजवळील गळती दुरुस्ती, हद्दवाढ भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा, पाइपलाइन नसलेल्या ठिकाणी बोअरवेल घेणे व नगरपरिषद इमारतीवर रेनवॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करण्याचा मुद्दा मांडण्यात आला. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत कंकालेश्वर, खंडेश्वरी देवी, राममंदिर, कोरडे गणपती, सोमेश्वर, दक्षिणमुखी हनुमान व विश्वेश्वर मंदिरासह विविध धार्मिक स्थळांच्या विकासाचे प्रस्ताव ठेवण्यात आले.

बांधकाम व नगररचना विभागांतर्गत शहरातील महत्त्वाचे रस्ते, डीपी रोड, पुलांची कामे मार्गी लावणे, नवीन डीपी रोड प्रस्तावित करणे तसेच गुंठेवारी प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा झाली. नागरी सुविधा मजबूत करण्यासाठी महिलांसाठी सार्वजनिक शौचालये, पुरुषांसाठी मुताऱ्या, नवीन स्मशानभूमी व कब्रस्थान, भाजी मंडई व फळ मार्केट उभारणे तसेच शहराच्या पश्चिम भागात नवीन अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली.

याशिवाय यशवंतराव चव्हाण उद्यानाचा विस्तार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवून परिसर सुशोभिकरण, भिमसृष्टी येथे माता रमाई पुतळा उभारणी, छत्रपती संभाजी महाराज व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे पुतळे उभारणे, बौद्ध विहार, चर्च, हज हाऊस उभारणी, शहरात ई-लायब्ररी सुरू करणे, बिंदुसरा व कर्परा नदी सुशोभिकरणासाठी डीपीआर तयार करून शासनाकडे पाठवणे तसेच तारांगण प्रकल्प सुरू करण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले.

नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या भाडे पुनर्रचनेद्वारे उत्पन्न वाढवण्याचा मुद्दा मांडण्यात आला, तर स्वच्छता विभागासाठी नवीन जेसीबी, कॉम्पॅक्टर, घंटागाड्या व ट्रॅक्टर खरेदी, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व नवीन उद्याने विकसित करण्यावर भर देण्यात आला. हद्दवाढ भागात आरोग्य केंद्र प्रस्तावित करण्यासोबतच शहरातील अनाधिकृत बॅनर व होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी डॉ.सारिका क्षीरसागर यांनी केले.

Beed municipal administration
Jafrabad civic issues : नाल्या तुंबल्या, रस्त्यांवर खड्ड्यांचा सुळसुळाट

डॉ.सारिका क्षीरसागर बनल्या बीडकरांचा आवाज

स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागनिहाय मांडण्यात आलेल्या प्रस्तावांमुळे आगामी काळात बीड शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, डॉ.सारिका क्षीरसागर या सातत्याने शहरवासीयांच्या समस्यांवर आवाज उठवत असून प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन प्रश्न सोडवित आहेत. यावरून त्या बीडकरांचा आवाज बनल्याचे चित्र दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news