Jafrabad civic issues : नाल्या तुंबल्या, रस्त्यांवर खड्ड्यांचा सुळसुळाट

जाफराबाद ः संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
Jafrabad civic issues
जाफराबाद ः येथील नगर पंचायत कार्यालयातील अधिकारी यांना निवेदन देताना प्रभाग क्रमांक एकमधील नागरिक. (छाया ः मुकेश भारद्वाज) pudhari photo
Published on
Updated on

जाफराबाद ः नगर पंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये मूलभूत सुविधांचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाल्यांची साफसफाई महिनोमहिने न झाल्याने सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागले असून परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. परिणामी लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संतप्त नागरिकांनी नगर पंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देत तात्काळ उपाययोजना न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले की, वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था शिगेला पोहोचली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य निर्माण होते. शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. यासोबतच अनेक पथदिवे बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे अपघात व चोरीसारख्या घटनांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Jafrabad civic issues
Jalna robbery : चाकूचा धाक दाखवून दहा लाखांचा ऐवज लंपास

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन सुमारे 100 ठिकाणी फुटल्याचा गंभीर दावा नागरिकांनी केला आहे. नाल्यांमधील सांडपाणी पाइपलाइनमध्ये मिसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यामुळे साथरोगांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

याबाबत दोन वेळा लेखी तसेच ऑनलाईन तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनावर विनोद वाघ, प्रा. अनिल वैद्य, गजानन दिवटे, मधुकर गायकवाड, प्रदीप गायकवाड, नामदेव यदमाळ आदींच्या सह्या आहेत.

Jafrabad civic issues
State-level employee strike : तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे धरणे
  • “कर आकारणी वेळेवर; पण सुविधा मात्र शून्य,” असा संतप्त सवाल वॉर्डवासीयांनी उपस्थित केला आहे. नाल्यांची तातडीने स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, बंद पथदिवे सुरू करणे व फुटलेल्या पाइपलाइनची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news