MP Bajrang Sonwane | विलास घुले प्रकरणाशी आमचा दूरान्वयेही संबंध नाही; सर्वांची समान चौकशी व्हावी : खा. बजरंग सोनवणे

माझा तपास यंत्रणा आणि शासनावर आमचा भरोसा आहे : महिलेवर अत्याचार करणाऱ्याची चौकशी व्हायला पाहिजे
MP Bajrang Sonwane  on Vilas Ghule Case
Bajrang Sonwane Pudhari
Published on
Updated on

MP Bajrang Sonwane on Vilas Ghule Case

केज : विलास घुले खून प्रकरणाशी आमचा दूरान्वयेही कोणताही संबंध नसून पोलिस यंत्रणा आणि राज्य सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे. आमचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासले जात असतील तर इतर संबंधित व्यक्तींचीही निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली.

विलास घुले खून प्रकरणात फिर्यादीने पुरवणी जबाबात खासदार सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचा उल्लेख केल्यानंतर सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक वेंकटराम यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) करत असून त्या तपास यंत्रणेवर तसेच राज्य सरकारवर पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MP Bajrang Sonwane  on Vilas Ghule Case
Vilas Ghule Murder Case : घुले खून प्रकरणात एसआयटी अ‍ॅक्शन मोडमध्ये! आणखी एकाला अटक

मात्र, या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना आमच्यावर आरोप केले जात आहेत, असा दावा करत त्यांनी निष्पक्ष चौकशीची मागणी केली. स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींशी संपर्कात असलेल्या, त्यांना वाहन किंवा इतर साहित्य उपलब्ध करून दिल्याचे आरोप ज्यांच्यावर होत आहेत, अशा सर्व संबंधित व्यक्तींचेही सीडीआर तपासून चौकशी करण्यात यावी, असे ते म्हणाले.

याशिवाय एका महिलेवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हेगारांसह त्यांना मदत करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

MP Bajrang Sonwane  on Vilas Ghule Case
Beed Vilas Ghule case update | विलास घुले हत्या प्रकरण: आरोपींना मदत केल्याचा आरोप; खासदारपुत्र सौरव सोनवणेंची SIT कडून कसून चौकशी

वारंवार होत असलेल्या बदनामीच्या आरोपांचा उल्लेख करत, अशा प्रकारचे आरोप थांबले नाहीत तर न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला. काहीजण स्वतःची कृत्ये झाकण्यासाठी आमच्यावर आरोप करत असल्याचा दावा करत, "ज्यांना शेणात हात घालून तोंड काळे करण्याची सवय आहे, त्यांना आपण रोखू शकत नाही," असे वक्तव्य त्यांनी कुणाचेही नाव न घेता केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news