Vilas Ghule Murder Case : घुले खून प्रकरणात एसआयटी अ‍ॅक्शन मोडमध्ये! आणखी एकाला अटक

आतापर्यंत तब्बल १० जणांना अटक
Vilas Ghule Murder Case
Vilas Ghule Murder Case
Published on
Updated on

केज : बीड जिल्ह्यातील टाकळी ता. केज येथील विलास घुले खून प्रकरणात आणखी एकाला रविवारी (दि.२८) लातूर येथून अटक करण्यात आली. आतापर्यंत दहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

विलास घुले खून प्रकरणी रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सूरज उर्फ भैय्यासाहेब कदम, शुभम गायकवाड, नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात एसआयटीच्या पथकाने राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा ता. केज) यास लातूर येथून रविवारी दुपारी अटक केली. आतापर्यंत दहा जणांना पोलिसांनी अटक केल्याने खळबळ माजली आहे.

टाकळी येथे नागरिकांचा कँडल मार्च

विलास घुले यांच्या घरापासून रविवारी (दि.२८) सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली, या घटनास्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला व पुरुष हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.

दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ

विलास हत्या प्रकरणात सुरुवातीला अटक केलेल्या बाबासाहेब कदम, संतोष कदम या दोघांना न्यायालयाने २८ जून पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने रविवारी या दोघांना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news