Beed sugarcane fire | महावितरणचा हलगर्जीपणा? पाच एकर ऊस जळून खाक, मोठे आर्थिक नुकसान

Beed sugarcane fire | महावितरणचा हलगर्जीपणा? पाच एकर ऊस जळून खाक, मोठे आर्थिक नुकसान
Beed sugarcane fire
Beed sugarcane fire
Published on
Updated on

माजलगाव - माजलगाव तालुक्यातील छोटेवाडी येथे वीज तारांमुळे शेतातील उसाला आग लागून तब्बल पाच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

शेतकरी एकनाथ माळेकर, हनुमंत माळेकर व भानुदास माळेकर यांच्या शेतातील ऊसाला अचानक आग लागली. वीज तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे किंवा ठिणगी पडल्याने आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने पाच एकर क्षेत्रातील उभा ऊस पूर्णपणे जळून खाक झाला.

Beed sugarcane fire
Beed Crime : मोटरसायकलला कट मारल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला चामड्याच्या बेल्टने मारहाण

ऊस जळाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वीज वाहिन्यांची योग्य देखभाल व दुरुस्ती वेळेवर झाली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त ऊस क्षेत्राचा पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, महावितरणने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी देखील केली आहे.

Beed sugarcane fire
Ambajogai Crime : हातभट्टी तयार करणाऱ्याची कारागृहात रवानगी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news