

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात हातभट्टी तयार करण्याच्या प्रकरणात किशोर जाधव याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. वारंवार करवाई करुनही आरोपी त्याच प्रकारचा गुन्हा करत असल्याने त्याच्यावर एमपीडीए ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी किशोर जाधव याच्याविरोधातील मंजुरी दिली आहे. त्यावरून सदर इसमास दिनांक १२ सप्टेंबर रोजी ताब्यात घेऊन हर्सूल कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे अंबाजोगाई शहर पोलिसांनी हजर करून स्थानबद्ध केले आहे.
सदरची कामगिरी पो.नि. शरद जोगदंड, पोउपनि आनंद शिंदे, रमेश घुले, पो.ह. श्रीकृष्ण वडकर, मंगेश भोले, अनिल डोंगरे, संतोष गाडे, हनुमंत चादर, भागवत नागरगोजे, महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे, सर्व पो.स्टे. अंबाजोगाई शहर तसेच सपोउपनि अभिमन्यू औताडे, सचिन सानप, सचिन आंधळे, रामचंद्र केकाण, गोविंद भताने, बबन सलगर व बिबीषण चव्हाण, सर्व नेमणूक स्थागुशा बीड यांनी केलेली आहे.
भविष्यातही वाळूचा चोरटा व्यापार करणारे, अवैध गुटखा विक्री करणारे तसेच जातीय तथा धार्मिक तेढ निर्माण करणारे समाजकंटक यांचेवर व दादागिरी करणाऱ्या खंडणी बहाद्दर धोकादायक गुंडावर, बेकायदेशीर जुगार, लॉटरी व हातभट्टीचे दारूचा व्यवसाय चालवणारे व्यक्तींवर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिले आहेत.