Beed Crime : मोटरसायकलला कट मारल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला चामड्याच्या बेल्टने मारहाण

जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

माजलगाव : मोटरसायकलला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका अल्पवयीन मुलाला टोळक्याने लाथाबुक्क्यांनी तसेच चामड्याच्या बेल्टने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.१३) दुपारी साडेतीनच्या सुमारास माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथे घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून चौघांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिवरा येथील एक अल्पवयीन तरुण रविवारी दुपारच्या सुमारास माजलगावकडून सावरगावमार्गे हिवरा येथे मोटरसायकलवरून जात होता. यावेळी काही जणांनी त्याला अडवून मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यानंतर चामड्याच्या बेल्टनेही मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

याप्रकरणी सिद्धांत सिताराम अवघडे याने दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव पोलिसांत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. अभिमन्यू प्रल्हाद जगताप, बबलू जगताप, आनंद नाईकनवरे आणि अविनाश जोगडे अशी संशयितांची नावे आहे. त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आंनये हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news