Majalgaon FDA Action | माजलगावातील क्वालिटी बेकरीचा परवाना निलंबित

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; खाद्यपदार्थांचे दोन नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत
Majalgaon Quality Bakery License Suspended
Majalgaon Quality Bakery License Suspended Pudhari
Published on
Updated on

Majalgaon Quality Bakery License Suspended

माजलगाव : अस्वच्छ आणि अनारोग्यकारक वातावरणात खाद्यपदार्थांची निर्मिती व हाताळणी केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने माजलगाव तालुक्यातील मे. क्वालिटी बेकरीवर कारवाई केली आहे. ९ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत बेकरीमध्ये स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आले. जनआरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब लक्षात घेऊन प्रशासनाने बेकरीचा परवाना पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत क्वालिटी बेकरीची तपासणी करण्यात आली. यावेळी खाद्यपदार्थांची हाताळणी अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच पेस्ट कंट्रोलची नोंद, कामगारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे, अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा तपासणी अहवाल आणि आवश्यक अभिलेख उपलब्ध नसल्याचे तपासणीत आढळले.

Majalgaon Quality Bakery License Suspended
Majalgaon Protest | ‘आश्वासन नको, काम सुरू करा’; माजलगावात नागरिकांचा रास्ता रोको

या त्रुटींमुळे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील विविध तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले. कारवाईदरम्यान बेकरीमध्ये तयार करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे दोन नमुने ताब्यात घेण्यात आले. हे नमुने पुढील विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अधिक स्पष्टता होणार आहे.

दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून अन्न व औषध प्रशासनाने मे. क्वालिटी बेकरीचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Majalgaon Quality Bakery License Suspended
Majalgaon Corporator Protest | सत्ताधारी नगरसेविकेचेच उपोषण; माजलगाव पालिकेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

स्वच्छता आणि सुरक्षिततेचे पालन आवश्यक

अन्नपदार्थांची निर्मिती, साठवणूक किंवा विक्री करणाऱ्या आस्थापनांनी स्वच्छता, अन्नसुरक्षा आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाऊ शकते, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news