बीड : गावठी कट्ट्याचा धाक दाखवून पवनचक्‍की प्रकल्‍पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण; २ कोटींची मागणी

धानखरेदी गैरव्यवहार
धानखरेदी गैरव्यवहार
Published on
Updated on

गौतम बचुटे/केज (बीड) : केज जवळील महामार्गावरील टोल नाक्याजवळ गाडी अडवून गावठी कट्टयाचा धाक दाखवत बारा ते तेरा जणांनी पवन चक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्याचे अपहरण केले. त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली असल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, अवादा या पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीचे काम करीत असलेले टागोरनगर नाशिक जिल्ह्यातील टागोर नगर येथील सुनिल केदु शिंदे (ह. मु. जालना रोड बीड) आणि त्यांचे सहकारी हे दि. २८ मे रोजी रात्री बीड कडून केजकडे येत होते. त्यांना रात्री सुमारे ११:०० वाजण्याच्या सुमारास मस्साजोग ते केज दरम्यान गंगा माऊली साखर कारखान्या जवळ असलेल्या टोल नाक्याच्या पुढे एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी क्र (एम एच १५/ ई बी २६८२) सीह्याचं चालकाने इशारा करून त्यांची गाडी थांबविली. सुनील शिंदे यांनी गाडी थांबवली असता रमेश घुले रा. केज याने अधिकारी सुनिल शिंदे यांना आपण अधिगृहन करीत असलेल्या पवनचक्कीच्या जागेसंदर्भात बोलायचे आहे. असे म्हणुन रमेश घुले रा. केज याने त्याच्या कडील गावठी कट्ट्याचा धाक दाखवुन त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी संगणमत करुन बळजबरीने सुनिल शिंदे यांचे अपहरण केले. त्यांच्या स्कार्पिओ गाडीमध्ये बसवुन त्यांना माजलगाव मार्गे अहमदनगर जिल्ह्यातील खरवंडी ता. पाथर्डी येथे घेवुन गेले. तेथे त्यांनी सुनिल शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना कंपनीचे काम करायचे असेल तर दोन कोटी रु. ची खंडणी दयावी लागेल अशी धमकी देत पैशांची मागणी केली.

दरम्यान सुनिल शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची सुटका करून घेत केज दि. २९ मे रोजी रात्री केज पोलीस ठाण्यात रमेश घुले आणि त्याचे अकरा ते बारा साथीदार यांच्या विरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे व शस्त्र प्रतिबंधक कायद्या नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news