सावधान! विदर्भात उष्णतेचा कहर; ‘या’ भागात हलक्या पावसाचा अंदाज

Weather Update
Weather Update

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विदर्भात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. मंगळवारी नागपूरजवळील ब्रह्मपुरी या गावाचा पारा 47.1 अंशांवर गेल्याने राज्यात हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. तसेच नागपूर, वर्धा, अमरावतीचे तापमान 45 अंंशांवर गेले, तर दुसर्‍या बाजूला पुणे 29, तर महाबळेश्वरचा पारा 22 अंशांवर गेल्याने राज्यात नीच्चांकी तापमान ठरले.

मान्सून केरळ आणि पूर्वोत्तर भारताच्या सीमेवर येऊन ठेपलेला असताना उत्तर भारतासह महाराष्ट्रातील विदर्भात उष्णतेची लाट टिपेला पोहोचली आहे. मंगळवारी (दि. 28) ब्रह्मपुरीचा पारा 47.1 अंश सेल्सिअसवर गेल्याने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा उद्रेक झाला. पुढील 48 तासांत महाराष्ट्रात कमाल तापमानात 2 ते 3 अंशाने वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

आजपासून हलक्या पावसाचा अंदाज

कोकण व मध्य महाराष्ट्रात 29 मे ते 2 जूनपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज दिला आहे; तर विदर्भ, मराठवाड्यात 30 व 31 मेपासून हलक्या पावसाचा अंदाज आहे, तोवर विदर्भात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

राज्याचे मंगळवारचे तापमान

ब्रह्मपुरी 47.1, नागपूर 45.6, अमरावती 45, वर्धा 45, चंद्रपूर 44.8, गोंदिया 44.5, यवतमाळ 42.5, वाशिम 41.2, पुणे 29.9, मुंबई 33.8, कोल्हापूर 30.1, अलिबाग 33.5, रत्नागिरी 33.7, डहाणू 35, अहमदनगर 36.2, जळगाव 42, महाबळेश्वर 22, मालेगाव 41.8, नाशिक 33.3, सांगली 30.4, सातारा 28.6, सोलापूर 34.8, धाराशिव 37.6, छ. संभाजीनगर 37.4, परभणी 41.2, नांदेड 40.8, बीड 41.1, अकोला 42.2, बुलडाणा 39.4.

हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद

महाबळेश्वर 22, सातारा 28, पुणे 29 अंशांवर

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news