Beed gutkha seizure : बीडमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

गुन्हे शाखेची कारवाई; ५९ हजाराचा मुद्देमाल जप्त
Beed gutkha seizure
बीडमध्ये साडेतीन लाखांचा गुटखा जप्तpudhari photo
Published on
Updated on

बीड : शहरातील पेठ बीड भागातील चांदणे वस्ती येथील पत्र्याच्या शेडमध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच शनिवार (दि.२८) रोजी सकाळी ८ च्या सुमारास कारवाई केली असता ३ लाख ५९ हजार ३८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बीड जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध गुटखा, वाळू यावर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरू असून बीड शहरातील पेठ बीड भागातील चांदणे वस्तीत फेरोज दस्तगीर तांबोळी (रा. चांदणे वस्ती ता.जि.बीड) याने स्वतःच्या फायद्यासाठी पत्र्याच्या शेडमध्ये व घरामध्ये अवैध गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवलेला असल्याची माहिती मिळताच शनिवार (दि.२८) रोजी सकाळच्या सुमारास सदरील ठिकाणी कारवाई केली असता ३ लाख ५९ हजार ३८८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Beed gutkha seizure
Coconut shell benefits : कचरा नव्हे,खजिना! नारळाच्या सालीचे 'हे' आहेत फायदे

सदरील आरोपी फेरोज तांबोळी हा पोलिसांना पाहताच घटनास्थळावरून पळून गेला असून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि श्रीराम खटावकर, पो.ह. राहुल शिंदे, युनूस बागवान, गोविंद राख, स्वाती मुंडे, अशपाक सय्यद, मनोज परजणे यांनी केली.

Beed gutkha seizure
Ramdas Athawale : रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्मांचा पक्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news