Girls safety concern : मुलींच्या छेडछाड प्रकरणी कडक कारवाईची मागणी

क्षीरसागर दाम्पत्यांचे एसपींना निवेदन
Girls safety concern
मुलींच्या छेडछाड प्रकरणी कडक कारवाईची मागणीpudhari photo
Published on
Updated on

बीड : बीड शहरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस परिसरात मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त करत भाजपचे युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर आणि नगरसेविका डॉ. सारिका क्षीरसागर यांनी मंगळवारी (दि. 10) पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. शहरातील मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी ठोस मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेसच्या बाहेर काही ठिकाणी छेडछाडीच्या घटना वाढत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. काही समाजकंटक एकत्र येऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे प्रकार समोर येत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे त्यांनी नमूद केले.

Girls safety concern
Beed News : पंचायत समितीची ‌‘पावणेचार कोटींची‌’ नवी इमारत धूळखात

अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी संबंधितांवर कडक व तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी दामिनी (चिडीमार) पथकाच्या माध्यमातून शाळा-कॉलेज व कोचिंग क्लासेस परिसरात नियमित पेट्रोलिंग सुरू ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आली. संशयित हालचालींवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई केल्यास अशा घटना रोखता येतील, असे मत त्यांनी मांडले.

Girls safety concern
Trespassing conviction case : घुसखोरांना दोन वर्षांची शिक्षा

तसेच शहरातील अनेक पोलीस चौक्या सध्या बंद अवस्थेत असल्याने त्या तातडीने सुरू करून तेथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, जेणेकरून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होईल, अशी मागणीही डॉ. क्षीरसागर यांनी केली. या संदर्भात पोलीस अधीक्षकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान युवा नेते राणा चव्हाण, भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष संग्राम बांगर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news