Trespassing conviction case : घुसखोरांना दोन वर्षांची शिक्षा

जालना जिल्हा, सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Trespassing conviction case
घुसखोरांना दोन वर्षांची शिक्षा(File Photo)
Published on
Updated on

जालना ः बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश2, जालना यांनी आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी 500 रुपये दंड, दंड न भरल्यास दोन दिवसांची अतिरिक्त कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

पोलीस स्टेशन परतूर येथे नोंद असलेल्या गुन्हा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी रेंगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Trespassing conviction case
Aaple Sarkar portal services : नागरिकांना दर्जदार सेवा द्या : आयुक्त

प्रत्यक्ष कारवाईत पोलीस उपनिरीक्षक वैद्य, पोलीस उपनिरीक्षक खंदारे, पोलीस अमलदार देवा जाधव, पोलीस अमलदार राम पारवे, पोलीस अमलदार महेश कोरडे, पोलीस अमलदार अमोल तिबुले, महिला पोलीस अमलदार वाघ आणि महिला पोलीस अमलदार गाडेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला

Trespassing conviction case
MLA Santosh Danve : विकासापासुन एकही गाव वंचीत राहणार नाही

न्यायालयात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. जयश्री बी. सोनके यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तपासादरम्यान साक्षीपुरावे, कागदपत्रे व अन्य तांत्रिक पुरावे सादर करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news