बीड: जिवाचीवाडी येथे पैशाच्या कारणावरून पिता पुत्राला मारहाण

चौघा जणांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा
Beed, Jivachiwadi crime news
बीड: जिवाचीवाडी येथे पैशाच्या कारणावरून पिता पुत्राला कोयत्याने मारहाण करण्यात आली.File Photo

केज : पैसे परत देण्यासाठी घरी बोलावून चुलत भाऊ व त्याचे वडील यांना कोयते आणि दगडाने मारहाण करून दोघांना जखमी केले. याप्रकरणी सोमेश्वर काळे यांनी तक्रार दाखल केली आहे. बाबासाहेब नानाभाऊ काळे, सि‌द्धेश्वर बाबासाहेब काळे, आशाबाई बाबासाहेब काळे आणि दिपाली बाबासाहेब काळे या चौघा जणांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिवाचीवाडी (ता. केज) येथे ही घटना घडली.

Beed, Jivachiwadi crime news
बीड : सेल्फी घेण्याच्या बहाण्याने गर्भवती महिलेला मारली मिठी; शिक्षकावर गुन्हा

तुझे कशाचे पैसे ?, असे म्हणत मारहाण

या बाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. १६) सकाळी ११च्या सुमारास जिवाचीवाडी येथे सोमेश्वर बापूराव काळे याला त्याचा चुलत भाऊ सिध्देश्वर बाबासाहेब काळे याने त्याचे असलेले पैसे घरी येवून घेवून जा. असे म्हणून सोमेश्वर काळे याला घरी बोलावून घेतले. सोमेश्वर काळे हा त्याच्या घरी गेल्या नंतर सिद्धेश्वर काळे हा त्याला म्हणाला की, "तुझे कशाचे पैस ?" असे म्हणुन बाबासाहेब नानाभाऊ काळे यांनी सोमेश्वर काळे यांच्या गचुऱ्याला धरुन खाली पाडले आणि सि‌द्धेश्वर काळे, आशाबाई काळे, दिपाली काळे हे त्याच्या अंगावर पडले. त्यांची आरडा-ओरड व आवाज ऐकून सोमेश्वर काळे याचे वडील बापू नानाभाऊ काळे हे पळत आले. त्या वेळी बाबासाहेब काळे याने घराच्या माळ्यावर ठेवलेले कोयते घेऊन सोमेश्वर काळे याला मारले. तसेच त्याचे वडील बापू काळे यांच्या उजव्या हातावर कोयत्याचा वार लागला. नंतर सिध्देश्वर काळे याने सोमेश्वर काळे यांच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली. तसेच बापू काळे यांच्याही डोक्यात दगड मारून दुखापत केली.

केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news