बीड : सेल्फी घेण्याच्या बहाण्याने गर्भवती महिलेला मारली मिठी; शिक्षकावर गुन्हा

गेवराई तालुक्यातील घटना
Beed Crime News
शिक्षकाने महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.File Photo

गेवराई : गर्भवती महिलेला सेल्फी घेण्याच्या बहाण्याने एका शिक्षकाने मिठी मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेवराई तालुक्यातील एका गावखेड्यात रविवारी (दि.१४) ही घटना घडली. याप्रकरणी शिक्षकाच्या विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime News
Thane News : मंदिरातील सेवेकर्‍यांकडून विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून हत्या

गर्भवती असल्याने २१ वर्षीय महिला ही गेवराई तालुक्यातील एका गावखेड्यात आली होती. पिडितेच्या घरी रविवारी (ता १४) दुपारी तीन वाजता एक शिक्षक घरी गेला. त्यानंतर चहा घेत शिक्षकाने पिडीतेशी बातचित केली. यावेळी तु शिक्षण बंद केले की सुरू आहे, असे शिक्षकाने पिडित महिलेला विचारले असता शिक्षण बंद केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर शिक्षकांने दार बंद करून तु माझ्याजवळ बस. मला तुझ्याबरोबर सेल्फी घ्यायचा आहे, असे म्हणत त्या महिलेला मिठी मारली. यानंतर महिला घाबरून ओरडली. ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील दोघे त्या महिलेच्या मदतीला धावून आले. व त्यांनी शिक्षकाच्या तावडीतून महिलेची सुटका केली. पिडितेच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षक फरार झाला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news