Beed Fake Teacher Recruitment Scam : बोगस शिक्षक भरती प्रकरण; दोषींवर कारवाईची टांगती तलवार !

चौकशी समिती करणार आवक-जावक खाडाखोडची कसून चौकशी
Teacher Recruitment Scam
Teacher Recruitment Scampudhari photo
Published on
Updated on

बीड : बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सन २००६ ते डिसेंबर २०१२ या कालावधीत झालेल्या खाजगी शाळांमधील बोगस शिक्षक भरती व त्यांच्या मान्यतांमध्ये झालेला मोठा घोटाळा 'दैनिक पुढारी'ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून चव्हाट्यावर आणला होता. 'पुढारी'च्या या रोखठोक आणि धडक बातमी मालिकेचा मोठा इम्पॅक्ट अखेर झाला आहे. याप्रकरणी कालच शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांनी स्वतंत्र चौकशीचे आदेश जारी केले असून, या घोटाळ्याची पाळेमुळे खोदण्यासाठी त्रिस्तरीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या आवक-जावक रजिस्टरमध्ये मागील तारखांमध्ये टायपिंग केलेल्या जावक नंबरच्या याद्या चिकटवून, मूळ रजिस्टरमध्ये खाडाखोड व छेडछाड करून बोगस शिक्षकांच्या मान्यता पदरात पाडून घेण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. 'दैनिक पुढारी'ने या संपूर्ण गैरप्रकारावर प्रकाश टाकत शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला होता.

Teacher Recruitment Scam
Nanded Crime : दोन वर्षांच्या चिमुकलीवर ३५ वर्षांच्या व्यक्तीकडून अत्याचार

यावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष इंजि. सादेक इनामदार यांनी वेळोवेळी निवेदने देऊन, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करण्याची आणि छेडछाड केलेले जावक रजिस्टर ताब्यात घेण्याची मागणी केली होती.

पुढारी'च्या बातम्या आणि प्राप्त तक्रारींची गंभीर दखल घेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे शिक्षण उपसंचालक कैलास दातखीळ यांनी दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सुधारित आदेश काढून त्रिस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. चौकशी समितीत श्रीमती सविता बिरगे (शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि. प. परभणी) -अध्यक्ष, श्री श्रीकृष्ण देशमुख (ज्येष्ठ अधिव्याख्याता, डायट अंबाजोगाई, जि. बीड) -सदस्य, श्रीमती असावरी काळे (उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प. हिंगोली) - सदस्य यांचा समावेश आहे.

Teacher Recruitment Scam
Hingoli Turmeric Theft : गोदामातून हळदीचे कट्टे लंपास

दोषींवर होणार कडक कारवाई

या समितीला सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेऊन आपला स्वयंस्पष्ट अभिप्राय व अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीसाठी आवश्यक असणारे सर्व मूळ दस्तऐवज व नोंदवही समितीला उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news