Beed Teacher Recruitment Scam : बीड जिल्ह्यातील २१८ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडित

बोगस भरतीप्रकरणी चौकशी समितीचा दणका
Beed Teacher Recruitment Scam
Beed Teacher Recruitment Scampudhari photo
Published on: 
Updated on: 

बीड : शशी केवडकर

बीड जिल्ह्यातील कथित बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रकरणात चौकशी समितीने मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत २१८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवा खंडित करण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण उपसंचालकांनी घेतल्याची माहिती तक्रारदार इंजि. सादेक इनामदार यांनी दिली. यामध्ये माध्यमिक विभागातील २११, तर प्राथमिक विभागातील ७ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

१८ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.बीड जिल्ह्यात मागील पाच ते सात वर्षांत खासगी शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमित भरती झाल्याच्या तक्रारी होत्या. शासनाची नियमित भरती प्रक्रिया बंद असतानाही लाखो रुपयांची देवाणघेवाण करून नियुक्त्या केल्याचा आरोप आहे.

Beed Teacher Recruitment Scam
Bopodi Khadki Traffic: कोट्यवधी खर्चून रस्ता रुंदावला; तरीही बोपोडी-खडकीत वाहतूक कोंडी

काही ठिकाणी जुन्या तारखांचे नियुक्ती आदेश दाखवून भरती करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणाचा दैनिक ‘पुढारी’ने सातत्याने पाठपुरावा करत कथित गैरप्रकार पुराव्यांसह समोर आणले. त्यानंतर राज्य शासनाने विशेष तपास पथकाची नियुक्ती करून सखोल चौकशीचे आदेश दिले. विविध बाबींच्या तपासासाठी स्वतंत्र समित्याही स्थापन करण्यात आल्या.

कारवाईबाबत गुप्‍तता

झालेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर इंजि. सादेक इनामदार न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार आहेत. तसेच या प्रकरणातील संबंधित अधिकारी, संस्थाचालक, दलाल आणि लाभार्थी यांच्याविरुद्ध मकोकांतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.कारवाईबाबत गुप्तता २१८ कर्मचाऱ्यांच्या सेवा खंडित करण्याच्या कारवाईबाबत शिक्षण विभागाकडून कमालीची गुप्तता पाळली जात असल्याची चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले.

Beed Teacher Recruitment Scam
Benjamin Netanyahu: नेतान्याहू पुन्हा इस्रायलचे पंतप्रधान होणार? सत्तास्थापनेसाठी आयझेनकोट यांचे 'लिकुड' पक्षाला निमंत्रण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.