Benjamin Netanyahu: नेतान्याहू पुन्हा इस्रायलचे पंतप्रधान होणार? सत्तास्थापनेसाठी आयझेनकोट यांचे 'लिकुड' पक्षाला निमंत्रण

इस्रायलच्या 'याशार' (नॅशनल युनिटी) गटाचे नेते गादी आयसेनकोट यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाशी आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे.
Gadi Eisenkot, Benjamin Netanyahu
Gadi Eisenkot, Benjamin Netanyahu File Photo
Published on: 
Updated on: 

Benjamin Netanyahu

नवी दिल्ली: इस्रायलमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्राध्यक्षांनी याशर पक्षाचे नेते गादी आयझेनकोट यांना सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले असून, त्यांना २८ दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

सुरुवातीला अरब पक्षांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, या चर्चेतून कोणताही तोडगा निघताना दिसत नसल्याने आयझेनकोट यांनी आता आपले राजकीय प्रतिस्पर्धी बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाशी आघाडी करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंदर्भात त्यांनी लिकुड पक्षाला चर्चेचे निमंत्रण दिले असून, २२ नोव्हेंबरपासून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे.

Gadi Eisenkot, Benjamin Netanyahu
Nishikant Dubey on Sonia Gandhi: ‘मारुती’च्या खऱ्या मालकीण सोनिया गांधीच होत्या; भाजप खासदाराचा मोठा आरोप

नेतान्याहू पुन्हा पंतप्रधान होणार?

नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बेंजामिन नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाने ५३ जागांवर विजय मिळवला आहे. तर आयझेनकोट यांच्या याशर पक्षाला ४८ जागा मिळाल्या आहेत. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला ६१ जागांचा बहुमताचा आकडा कोणत्याही पक्षाला गाठता आलेला नाही. त्यामुळे आघाडीच्या चर्चेदरम्यान लिकुड पक्षाकडून नेतान्याहू यांनाच पुन्हा पंतप्रधान करण्याची अट ठेवली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, निर्धारित मुदतीत आयझेनकोट यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यास राष्ट्राध्यक्ष नेतान्याहू यांनाही सरकार स्थापनेचे निमंत्रण देऊ शकतात.

आयझेनकोट यांच्या पक्षाला लिकुड पक्षाशी आघाडी करण्यास भाग पाडण्याची रणनीती नेतान्याहू यांनी यापूर्वीपासूनच आखल्याचे सांगितले जात आहे. यासाठी त्यांनी अनेकदा अरब पक्षांना आयझेनकोट यांच्या विरोधात भूमिका घेण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. गेल्या रविवारीही दोन्ही पक्षांमध्ये चर्चेला सुरुवात झाली होती. मात्र, त्यातून कोणताही निष्कर्ष निघाला नाही. विशेष म्हणजे, आयझेनकोट यांचा पक्ष हा नेतान्याहू यांचा कट्टर विरोधक मानला जातो. असे असले तरी निवडणुकीत दोन्ही पक्षांना स्वतंत्रपणे बहुमत मिळवता आलेले नाही.

आयझेनकोट यांची नेमकी अट काय?

आयझेनकोट यांच्या पक्षाने लिकुडसोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यासाठी एक महत्त्वाची अट ठेवली आहे. या आघाडीच्या सरकारचे नेतृत्व आयझेनकोट स्वतः करतील आणि नेतान्याहू यांना सरकारपासून दूर ठेवण्यात यावे, अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, आता आयझेनकोट यांच्या पक्षातच आघाडी करण्याच्या मुद्द्यावर मतभेद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, सरकार स्थापनेसाठी आयझेनकोट यांना २८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांना आवश्यक वाटल्यास या मुदतीत आणखी १४ दिवसांची वाढ करता येऊ शकते.

आयझेनकोट यांच्यासमोर तीन पर्याय?

इस्रायलच्या 'याशार' (नॅशनल युनिटी) गटाचे नेते गादी आयसेनकोट यांनी शुक्रवारी सांगितले की, जर सर्वसमावेशक युती सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले, तर ते स्वतःच्या नेतृत्वाखाली 'राष्ट्रीय आपत्कालीन सरकार' स्थापन करण्यास तयार आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, ते वाटाघाटींना अनिश्चित काळापर्यंत लांबू देणार नाहीत. सध्या आयसेनकोट यांच्यासमोर तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे अति-रूढीवादी ज्यू पक्षांशी (हारेदीम) चर्चा करणे. याचा उद्देश अशी एक रूपरेषा तयार करणे आहे, जी इस्रायली लष्कराच्या गरजा पूर्ण करेल आणि त्याच वेळी जे लोक पूर्ण वेळ 'तोराह'च्या अभ्यासात मग्न असतात, त्यांचा दर्जाही जपून ठेवेल.

दुसऱ्या पर्यायामध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या 'लिकुड' पक्षासोबत वाटाघाटींचा समावेश आहे. आयसेनकोट यांनी नमूद केले की, समझोता घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू असूनही, या चर्चेत अजूनही काही अडथळे कायम आहेत. तिसऱ्या पर्यायाबाबत आयसेनकोट यांनी सांगितले की, जर सर्वसमावेशक युती सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, तर ते राष्ट्रीय आपत्कालीन सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. ज्यामध्ये शपथविधीच्या आधी किंवा नंतर सरकारचा विस्तार करण्याचा त्यांचा मानस आहे.

Gadi Eisenkot, Benjamin Netanyahu
SBI: ७० वर्षांच्या आजोबांनी बँकेला चांगलाच धडा शिकवला! SBI दररोज देणार ५ हजार नुकसानभरपाई; नेमकं प्रकरण काय?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.