Beed Crime : लोखंडी रॉडने तरुणावर अमानुष हल्ला; संदीप दहिफळे गंभीर जखमी

आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जखमी तरुणाच्या वडिलांनी केली आहे.
Beed Crime News
लोखंडी रॉडने तरुणावर अमानुष हल्ला; संदीप दहिफळे गंभीर जखमीFile Photo
Published on
Updated on

बीड : शहरातील अंकुश नगर परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संदीप दहिफळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील अंकुश नगर भागात संदीप दहिफळे याला तीन ते चार जणांनी अडवून त्याच्यावर अचानक हल्ला केला. आरोपींनी प्रथम धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर आणि छातीवर वार केले. त्यानंतर लोखंडी रॉडने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या हाताच्या हाडाचे तीन तुकडे झाले असून छाती, पोट आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

Beed Crime News
Dharur Ghat tanker accident : धारूर घाटात ब्रेक फेल; टँकर 300 फूट दरीत कोसळला

घटनेनंतर जखमी संदीप दहिफळे याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या प्रकरणात वैद्यकीय कायदेशीर नोंद (एमएलसी) करण्यात आली असली तरी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जखमी तरुणाच्या वडिलांनी केली आहे.

Beed Crime News
Temperature impact on harvesting : उन्हाने वाढविली शेतकऱ्यांची चिंता

या घटनेमुळे अंकुश नगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news