Beed Crime News : प्रेमासाठी पतीचा काढला काटा !

मृत्यू प्रकरणात पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Beed Crime News
Beed Crime News : प्रेमासाठी पतीचा काढला काटा !file photo
Published on
Updated on

Beed Crime News: Husband killed for love

बीड, पुढारी वृत्तसेवा : नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लिंबागणेश परिसरात ३१ मे रोजी आढळून आलेल्या किरण सोनवणे यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या य घटनेमागे प्रेमसंबंधातून रचलेला खुनाचा कट असल्याचे निष्पन्न झाले असून, पत्नीनेच पतीला घराबाहेर पाठवून प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या घडवून आणली या बाबत पोलीसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे.

Beed Crime News
Beed Crime | अंजनवती खून प्रकरणात मृताच्या पत्नीचा सहभाग; अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

मृत किरण सोनवणे यांचा मृतदेह रस्त्यालगत दुचाकीसह आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र तपासादरम्यान पोलिसांना अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्याने तपासाची दिशा बदलली आणि अखेर हा खून असल्याचे उघड करून पोलीस कोठडीत या बाबत मयताच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हा खून कशा पद्धतीने केला याची कबुली देखील दिली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मृताची पत्नी प्रियंका सोनवणे, तिचा कथित प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे यांना अटक केली आहे. तपासातील माहितीनुसार, घटनेच्या दिवशी प्रियंका सोनवणे हिने किरण यांना चिकन राईस आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. त्यानंतर तिने प्रियकर दशरथ परदेशी याला ही माहिती दिली. दशरथ परदेशी आणि त्याचा साथीदार धीरज येडे यांनी किरण सोनवणे यांचा गळा आवळून खून केला.

त्यानंतर मृतदेहाजवळ दुचाकी टाकून अपघाताचा बनाव केला. विशेष म्हणजे खून केल्यानंतर दशरथने प्रियंका सोनवणे हिला फोन करून "कार्यक्रम ओके" असा सांकेतिक संदेश दिला. त्यानंतर दोघांमध्ये इंस्टाग्राम कॉलद्वारे तब्बल चार ते पाच तास संवाद झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या संवादासह अन्य डिजिटल पुरावे पोलिसांनी हस्तगत केले असून ते तपासासाठी महत्त्वाचे ठरत आहेत.

Beed Crime News
Beed Crime News : खून झालेल्या कामगाराचा मृतदेह थेट पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर

आरोपीच्या माहितीनुसार, प्रेम संबंध तसेच मृत किरण सोनवणे हे मद्यपान करून पत्नीला वारंवार त्रास देत असल्याचा दावा आरोपींकडून करण्यात आल्याचे समजते. मात्र या दाव्यांची सत्यता तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. डिजिटल पुरावे, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया संवाद आणि घटनास्थळावरील तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news