Beed Crime | अंजनवती खून प्रकरणात मृताच्या पत्नीचा सहभाग; अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

तिसऱ्या आरोपीला अटक : तीन दिवसांची पोलीस कोठडी
Beed Wife Arrested Husband Death Case
Beed Wife Arrested Husband Death Case AI
Published on
Updated on

Beed Wife Arrested Husband Death Case

नेकनूर : नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनवती येथील युवकाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी खुनाच्या कटाचा पर्दाफाश केला. या प्रकरणात मृताच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंजनवती येथील किरण बंडू सोनवणे या कामगार युवकाचा मृतदेह काही दिवसांपूर्वी लिंबागणेश-अंजनवती मार्गावरील नाल्यात आढळून आला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र, सखोल तपासादरम्यान त्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नेकनूर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली.

Beed Wife Arrested Husband Death Case
Beed Crime | चारित्र्याच्या संशयावरुन तरुणीवर चाकूने सपासप वार करून हल्ला; एकाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगाने तपास करत तळोजा-पनवेल परिसरातून दशरथ परदेशी आणि धीरज येडे या दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान मिळालेली माहिती, तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे तसेच साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे मृताची पत्नी प्रियांका सोनवणे (वय २५, रा. अंजनवती) हिचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले.

प्राथमिक तपासानुसार, प्रियांका सोनवणे हिचे मुख्य आरोपीशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच पतीचा काटा काढण्यासाठी कट रचण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या कटात तिने सहकार्य केल्याच्या आरोपावरून तिला अटक करण्यात आली.

Beed Wife Arrested Husband Death Case
Beed Crime: खून करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या दोघांना बेड्या

दरम्यान, यापूर्वी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींसह महिला आरोपीच्या अधिक चौकशीसाठी न्यायालयाने तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मंजूर केली आहे. गुन्ह्यामागील संपूर्ण षड्यंत्र, संबंधित पुरावे आणि आरोपींची भूमिका याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सोमवारी (दि.८) सायंकाळी केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांनी नेकनूर पोलीस ठाण्याला भेट देऊन तपासाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news