Beed Crime | भामट्यांचा नवा फंडा...! मोठ्या अधिकाऱ्याचा अपघात झाल्याचे सांगत केली उपविभागीय अधिकाऱ्याचीच फसवणूक

बीडमध्ये उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्याकडून उकळले तीस हजार रुपये : आमदार धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहायकालाही केला होता फोन
AI generated Image
AI generated Image
Published on: 
Updated on: 

बीड : भामट्यांनी आता फसवणुकीचा नवा फंडा शोधला आहे. मोठ्या अधिकाऱ्याचे नाव घ्यायचे आणि त्याचा अपघात झाल्याचे सांगायचे. एखाद्या राजकीय नेत्याच्या पीए कडून अथवा एखाद्या अधिकाऱ्याकडून पैसे मागायचे. असा सगळा हा प्रकार आहे.

अशी केली फसवणूक

बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांना दिनांक 20 सप्टेंबर रोजी आमदार धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप जोशी यांचा फोन आला व त्यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार व नातेवाईकांचा वडवणी जवळ अपघात झाल्याचे सांगितले. तसेच त्यांनी एक नंबर देखील गौरव इंगोले यांना पाठवला. हा नंबर मिळताच गौरव इंगोले यांनी तातडीने त्या नंबर वर फोन केला असता त्या व्यक्तीने आपले नाव राजन पाटील असे असल्याचे सांगितले व सौरभ कटियार हे ॲम्बुलन्स मध्ये बसून आहेत त्यांचा मोबाईल फुटल्यामुळे आणि इतरांना दुखापत झाल्याने ॲम्बुलन्सच्या चालकाच्या फोनपे स्कॅनर वर पैसे पाठवण्याचे सांगितले.

AI generated Image
Beed Crime News : तक्रारदार महिलेवरच पोलिस उपनिरीक्षकाकडून अत्याचार

यावर गौरव इंगोले यांनी लोकेशन पाठवा असे म्हटले परंतु संबंधित व्यक्तीने लोकेशन शेअर न करता फोन पे स्कॅनर पाठवले. अपघात घडल्याचे ऐकून गौरव इंगोले यांनी तातडीने त्या नंबर वर त्यांच्या भावाच्या खात्यावरून दहा हजार रुपये पाठवले त्यानंतर त्या व्यक्तीने आणखी पैसे हवे आहेत असे म्हटल्यानंतर वीस हजार रुपये पाठवले असे एकूण 30 हजार रुपये पाठवल्यानंतर गौरव इंगोले यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत या प्रकाराविषयी माहिती दिली.

यानंतर बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी थेट सौरभ कटियार यांच्याशी संपर्क साधून खातर जमा केली असता हा सगळा प्रकार बनावट असल्याचे लक्षात आले. या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता फोन पे स्कॅनर राजू मधुकर दामसे या नावाने असल्याचे समोर आले असून याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बड्या राजकीय नेत्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही फसवले?

बीडच्या माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या बाबतीत घडलेला हा प्रकार राज्यात इतर भागातील लोकप्रतिनिधींच्या स्वीय सहायकांच्या बाबतही घडल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये संबंधित स्वीय सहाय्यकाला फोन करून एखाद्या विभागाच्या अधिकाऱ्याचा नंबर घ्यायचा त्याला त्याच विभागाच्या वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्याचा अपघात झाल्याचे सांगायचे आणि पैसे घ्यायचे असा हा सगळा प्रकार असून आता या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news