Beed Crime News : तक्रारदार महिलेवरच पोलिस उपनिरीक्षकाकडून अत्याचार

वडवणीतील घटना; गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू
Beed Crime News
Beed Crime News : तक्रारदार महिलेवरच पोलिस उपनिरीक्षकाकडून अत्याचारfile photo
Published on
Updated on

Beed Crime News: Complainant woman tortured by police sub-inspector

वडवणी, पुढारी वृत्तसेवा : वडवणी पोलिस ठाण्यामध्ये पतीविरोधात तक्रार दिलेल्या महिलेवर पोलिस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.

Beed Crime News
Beed News : डॉ. पटवा यांना अटक करा; कडा पोलिस ठाण्यासमोर ५०० नागरिकांचा ठिय्या

गणेश राठोड (५५) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार महिला ही वडवणी शहरातील रहिवासी असून तिने तिच्या पतीविरोधात वडवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. याच गुन्ह्याच्या संदर्भात दि.१९ सप्टेंबर रोजी गणेश राठोड याने त्या महिलेला मोबाईलवरुन संपर्क साधला.

तुझ्या गुन्ह्याच्या संदर्भातील सर्व कामे मार्गी लावतो, त्यासाठी तुझ्या घरी येत आहे असे राठोड याने सांगितले. यानंतर राठोड हा रात्री दिड वाजण्याच्या सुमारास त्या महिलेच्या घरी पोहचला. यावेळी त्याने महिलेला गुन्ह्याच्या संदर्भात मदत करण्याचे आश्वासन देत तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश राठोड याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (अ) (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपासाची कार्यवाही सुरू केली आहे.

Beed Crime News
Ghagar Morcha : पाण्यासाठी चोरंब्यात निघाला 'घागर मोर्चा' !

या प्रकरणाचा तपास सपोनि द्रोणाचार्य यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. घटना घडल्यापासून राठोड ठाण्यात हजर झालेले नाहीत. प्रकरणाचा पुढील तपास वडवणी पोलिसांकडून सुरू आहे.अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गणेश राठोड याच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (अ) (१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाची नोंद करून तपासाची कार्यवाही सुरू केली आहे.

या प्रकरणाचा तपास सपोनि द्रोणाचार्य यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. घटना घडल्यापासून राठोड ठाण्यात हजर झालेले नाहीत. प्रकरणाचा पुढील तपास वडवणी पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news