

Beed Crime News
केज : केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाच्या ओट्यावर बसून एकाने मद्य प्राशन करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वरून स्मारकाची विटंबना व धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी रोहन गलांडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचोली माळी ता. केज येथील कर्मवीर शिक्षण संस्थेच्या आवारात स्वातंत्र्य सेनानी बसलिंग अप्पा भुजबळ यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारलेले आहे. १० मे रोजी सकाळी १०:०० वा.च्या सुमारास गावातील रोहन उत्तम गलांडे नावाच्या तरुणाचा स्मारकाच्या ओट्यावर बसून मद्य प्राशन करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे समाजातील नागरिकांमध्ये चिड निर्माण झाली आहे.
मद्यप्राशन करीत असलेल्या तरुणाला धनंजय महादेव शिंदे व अशोक आश्रूबा राऊत यांनी त्याला तेथून उठण्यास सांगितले त्त्याने त्यांना शिवीगाळ केली. त्याच बरोबर रोहन याने यापूर्वी ही गावातील दोन समजामध्ये तेढ निर्माण होऊन वाद होईल; अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने दोन समाजातील शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशोक रमेश राऊत यांनी दिलेल्या तक्रारी वरून रोहन गलांडे याच्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Meta Keywords:
Beed crime news, freedom fighter memorial, alcohol consumption case, disrespect to memorial, Beed police action, Maharashtra crime, public intoxication case
स्वातंत्र्य सेनानी बसलिंग आप्पा भुजबळ यांचा स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग :- स्वातंत्र्य सेनानी बसलिंग आप्पा भुजबळ यांनी हैदराबाद स्थानातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी आगळगाव येथे चालविल्या जात असलेल्या कॅम्पचे ते प्रमुख होते. तसेच त्यांनी ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे म्हणून चिंचोली माळी येथे १९५६ साली कर्मवीर शिक्षण संस्थेची स्थापना करून सर्वांना शिक्षणाचे द्वार खुले केले.
स्मारकाची विटंबना करून समाजाच्या भावना भडकवल्या प्रकरणी २४ तासाच्या आंत कायदेशीर कारवाई करावी अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना दिला आहे.