Beed Crime : नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

माजलगावमध्ये पराभूत उमेदवाराच्या गटाचे कृत्य; गुन्हा दाखल
Crime  News
Crime News pudhari
Published on
Updated on

माजलगाव ः नगरपालिकेच्या निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून नगरसेविका उज्ज्वला सचिन जावळे यांच्या पतीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना माजलगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात सचिन जावळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये झालेल्या निवडणुकीत उज्ज्वला सचिन जावळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रत्नमाला राकेश साळवे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीपासूनच दोन्ही गटांमध्ये वादाचे वातावरण निर्माण झाले होते.

Crime  News
Satara gang war: साताऱ्यात गँगवारमधून युवकाला संपवले

दि. 18 रोजी सचिन जावळे व आरोपी रोहित माणिक साळवे यांच्यात पुन्हा वाद झाला. या वादाचे रूपांतर मारामारीत होऊन आरोपीने सचिन जावळे यांच्या मानेवर लोखंडी रॉडने वार केला तसेच पोटावर चाकूने हल्ला करत गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना तत्काळ बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबात सचिन जावळे यांनी, निवडणुकीतील पराभवाचा राग मनात ठेवून रोहित साळवे याने मला जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला, असे सांगितले. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी रोहित माणिक साळवे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Crime  News
Jalgaon crime news | अपहरणाचा संशय : बेदम मारहाण करत अनोळखी तरूणाची हत्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news