Beed|आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे,५१ हजारांचा दारू साठा जप्त, पाच जणांवर गुन्हे

beed ashti liquor raid - “परीक्षाधीन उपअधीक्षक भारत पांढरेंची धडकेबाज कामगिरी; अवैध दारूविक्रीवर आष्टी पोलिसांचा दणका”
Beed
Beed
Published on
Updated on

कडा (बीड) - आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी-विदेशी दारू विक्रीविरोधात पोलिसांनी शनिवारी (दि. १९) विशेष मोहीम राबवत विविध ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत पाच जण अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आल्याचे पोलिसांचाकडून सांगण्यात आले. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अन्वये पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान एकूण ५१ हजार ५१० रुपये किमतींचा देशी-विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला.

किराणा दुकानातून दारू विक्री

पहिल्या कारवाईत आष्टी-बीड-सांगवी रोडलगत देसूर गावच्या शिवारातील शांताई किराणा दुकानात छापा टाकण्यात आला. येथे देसूर येथील अंकुश विठ्ठल आबनावे (वय ५०) हा अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्याकडून ९ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४२२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलमध्येही अवैध विक्री

दुसऱ्या कारवाईत डोईठाण शिवारातील बीड-अहिल्यानगर रोडलगत असलेल्या हॉटेल तारांगण येथे छापा टाकण्यात आला. बावी, ता. आष्टी येथील अंकुश नारायण सांगळे (वय ४६) हा अवैधरीत्या दारू विक्री करताना आढळून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्याच्याकडून १० हजार ५०० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४२४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

याच परिसरातील हॉटेल संकेत येथे पोलिसांनी कारवाई केली. सांगवी पाटण येथील बद्रीनाथ रामहरी भोसले (वय ४६) याच्याकडून १२ हजार १० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४२५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

सनी पॅलेस, हॉटेल जिव्हाळ्यावरही छापे

सांगवी पाटण शिवारातील बीड-अहिल्यानगर रोडलगत असलेल्या हॉटेल सनी पॅलेस येथे केलेल्या कारवाईत सचिन महादेव राजपुरे (वय ३१) याच्याकडून ९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ४२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. तर कारखेल बु.शिवारातील बीड-अहिल्यानगर रोडलगत असलेल्या हॉटेल जिव्हाळ येथे केलेल्या कारवाईत वैभव मोहन पवार (वय २३) याच्याकडून ९ हजार ७५० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. त्याच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

Beed
Vilas Ghule murder case : विलास घुले खूनप्रकरणी सीआयडी तपासावर आक्षेप

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक भारत पांढरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलिस हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, पोलिस हेड कॉन्स्टेबल काकडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल शेख, पोलिस शिपाई शेख, पोलिस शिपाई लोंढे व पोलिस हेड कॉन्स्टेबल भाग्यवंत यांनी सहभाग घेतला. आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूची विक्री, वाहतूक व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कायदेशीर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Beed
Beed Crime News : तक्रारदार महिलेवरच पोलिस उपनिरीक्षकाकडून अत्याचार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news