Vilas Ghule murder case : विलास घुले खूनप्रकरणी सीआयडी तपासावर आक्षेप

केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खूनप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असले तरी, मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी तपासाच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत.
Vilas Ghule murder case
Vilas Ghule murder case : विलास घुले खूनप्रकरणी सीआयडी तपासावर आक्षेपfile photo
Published on
Updated on

Objections raised regarding the CID investigation into the Vilas Ghule murder case

केज, पुढारी वृत्तसेवा केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खूनप्रकरणी सीआयडीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असले तरी, मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी तपासाच्या पद्धतीवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. दोषारोपपत्राची प्रत तसेच तपासाची संपूर्ण माहिती आपल्याला अद्याप देण्यात आलेली नाही. सर्व कागदपत्रांची माहिती मिळेपर्यंत संबंधित कागदपत्रांवर सही करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

Vilas Ghule murder case
Ghagar Morcha : पाण्यासाठी चोरंब्यात निघाला 'घागर मोर्चा' !

तपास या प्रकरणातील सीआयडीकडून सुरू असताना तपासी अधिकाऱ्याची भूमिका बदलण्याची मागणीही रमेश घुले यांनी केली आहे. तपासातील काही बाबींबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि निष्पक्षपणे व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, सौरभ सोनवणे यांच्याबाबत तपासात महत्त्वाच्या बाबी समोर आल्याचा दावा रमेश घुले यांनी केला आहे. यापूर्वी रमेश घुले यांनी सौरभ सोनवणे यांच्याशी आरोपींचा संपर्क असल्याचा दावा केला होता.

Vilas Ghule murder case
Beed Crime News : तक्रारदार महिलेवरच पोलिस उपनिरीक्षकाकडून अत्याचार

आरोपींनी सौरभ सोनवणे यांना ५७वेळा फोन केल्याचा दावाही त्यांनी केला होता. या कॉल रेकॉर्डचा सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली होती. आता अटकेत असलेल्या दहा आरोपींचे मोबाईल तपासणीसाठी पाठवले असून तो अहवाल आल्यानंतरच सौरभ सोनवणे याचा या प्रकरणात सहभाग होता अथवा नाही, हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news